Goa Assembly Session: "कर्ज काढून सण साजरे करू नका", अर्थसंकल्पावर भाष्य करताना युरी आलेमाव यांचा सरकारला टोला

Assembly Session: सरकार जनहितविरोधी कामांना अधिक प्राधान्य देत आहे. डोंगर, झाडे, पर्यावरण नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कर्ज काढणार नसल्याचे आश्‍वासन दिले होते.
Goa Assembly Session
Goa Assembly SessionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सरकार जनहितविरोधी कामांना अधिक प्राधान्य देत आहे. डोंगर, झाडे, पर्यावरण नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कर्ज काढणार नसल्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु अजूनही सातत्याने कर्ज काढले जात असून त्‍याद्वारे सण साजरे केले जात आहेत. हे प्रकार बंद होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत ते बोलत होते.

राज्यात डोंगर, झाडे, पर्यावरण नष्ट करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. २०३७ पूर्वी गोवा ‘स्वयंपूर्ण’ करण्‍याचे उद्दिष्ट सरकार ठेवले आहे. परंतु जी स्थिती ‘स्मार्ट सिटी’ची झाली, तीच याचीही होणार आहे. शेती, पर्यावरण, म्हादई, व्याघ्रसंरक्षण क्षेत्र याबाबत सरकार योग्य पावले उचलत नाही. ज्या बिगरसरकारी संस्था गोवा हिताची भूमिका घेतायत, त्यांना विरोध केला जातोय, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.

Goa Assembly Session
Goa Assembly: 1972च्या सर्व्हेत नोंद असूनसुद्धा बेकायदा राहिलेली घरं आता 'कायदेशीर'; महसूल,पंचायत खात्‍याकडून मिळणार प्रमाणपत्रे; CM सावंतांची घोषणा

युरी काय म्‍हणाले?

राज्यात सायबर गुन्हे वाढत असून, वर्षभरात १४९ कोटींचे घोटाळे झाले आहेत. वर्षाला सरासरी १५०० घटना नोंदविल्या जात आहेत.

राज्यातील अनेक भागात रात्री १० नंतर संगीत, ध्वनिप्रदूषण सुरूच आहे. बलात्कार, खुनांच्या घटनाही वाढल्‍या आहेत.

अल्पसंख्याक ख्रिस्ती आणि मुस्लिम बांधवांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.

Goa Assembly Session
Goa: "सुरक्षारक्षकांच्या वेतनावरील 18% जीएसटी बंद करणार" CM प्रमोद सावंतांचे विधानसभेत आश्‍‍वासन

कलाकारांना आपल्या कला दाखविण्यासाठी जागाच राहिल्या नाहीत. रवींद्र भवनांची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे कलाकार रस्त्यावर उतरले आहेत.

अर्थसंकल्पात लोकशक्तीचा उल्लेख आहे, परंतु सद्यःस्थितीत लोकांचा आवाज दाबला जात असून मूक आणीबाणी लादण्यात आली आहे.

६१ सरकारी शाळा पडल्या बंद

मागील तीन वर्षांत आरोग्य, शिक्षणावर खर्च केला जातोय. परंतु पाणी, पर्यटन आणि वाहतूक यांवर जेवढा खर्च करायला हवा, तो होत नाही. राज्यातील ६१ सरकारी शाळा बंद पडल्या आहेत. माध्यान्ह आहाराचा दर्जाही खालावला आहे.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाची स्थिती अतिशय बिकट आहे. तेथे डॉक्टर, साधनसुविधांची कमतरता आहे. तेथून बहुतांश रुग्‍णांना गोमेकॉत पाठविले जाते. सद्यःस्थितीत गोव्यातील तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक, संस्कृती आणि धार्मिक सौहार्द देखील सुरक्षित नाही, असे युरी आलेमाव म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com