Sulakshana Sawant And MP Sanjay Singh Dainik Gomantak
गोवा

Sulakshana Sawant: आप खासदार संजय सिंग अडचणीत; गोवा मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडून 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा खटला दाखल

Sulakshana Sawant: आप खासदार संजय सिंग यांच्याविरोधात पहिला अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्यात आलाय. डिचोली कोर्टात हा खटला दाखल करण्यात आला आहे.

Pramod Yadav

पणजी: गोव्यातील नोकरी घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आरोप करणारे आप नेते राज्यसभा खासदार संजय सिंग अडचणीत सापडले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी सिंग यांच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला आहे. भाजपच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

सरकारी नोकरीच्या नावाखाली गोमंतकीयांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे 'कॅश फॉर जॉब' प्रकरणावर आप नेते संजय सिंग यांनी गोवा भाजप सरकारवर टीका केली होती. याप्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसह, मंत्री व आमदारांचा समावेश असल्याचा आरोप, सिंग यांनी केला होता. गेली 10 वर्षे गोवा भाजप जनतेला नोकरीचे आमिष दाखवून फसवत असल्याची टीका सिंग यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केली होती.

गोव्यातून देखील विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आरोप केले होते. मुख्यमंत्री सावंत यांनी याप्रकरणात पत्नीचे नाव घेणाऱ्यांवर बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, आता याप्रकरणी आप खासदार संजय सिंग यांच्याविरोधात पहिला अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्यात आलाय. डिचोली कोर्टात हा खटला दाखल करण्यात आला आहे.

कॅश फॉर जॉब प्रकरणात पूजा नाईक, दीपश्री सावंत गावस यांच्यासह जवळपास ३० ते ३५ जणांना अटक करण्यात आलीय. या घोटाळ्याची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात जात आहे. विरोधकांनी या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांना घेरत न्यायालयीन चौकशीची मागणी केली. सध्या ईडीने या प्रकरणाचा तपास हाती घेतला असून, पोलिसांकडून प्रकरणाची सर्व माहिती ईडीचे अधिकारी घेत आहेत.

नोकरी घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर देखील आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी पत्नीचे नाव विनाकारण घेतले जात असून, आरोप करणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार खासदार संजय सिंग यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले संजय सिंग आता सुलक्षणा सावंत यांनी दाखल केलेल्या खटल्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT