CM Pramod Sawant Dainik Gomantak News
गोवा

CM Pramod Sawant: भिवपाची गरज आसा; वाढत्या अपघातानंतर CM सावंतांची मद्यपी वाहनचालकांना तंबी !

Goa Government Road Safety Initiatives: राज्यातील वाढते अपघात चिंतेचा विषय ठरत आहेत. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. रस्त्यांची दुरावस्था हे वाढत्या अपघातांसाठी कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.

Manish Jadhav

राज्यातील वाढते अपघात चिंतेचा विषय ठरत आहेत. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. रस्त्यांची दुरावस्था हे वाढत्या अपघातांसाठी कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. विरोधकांनीही सरकारला वेळोवेळी अपघातांच्या घटनांवरुन निशाण्यावर घेतले. याचदरम्यान आता राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील वाढत्या अपघातावर चिंता व्यक्त केली.

आज (14 ऑक्टोबर) रोड सेफ्टी डे निमित्त एका कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी ही चिंता व्यक्त केली. राज्यातील अपघातांची मालिका लक्षात घेता 'भिवपाची गरज आसा' असे मुख्यमंत्री म्हणाले. सुरक्षा ही केवळ सरकारचीच जबाबदारी नसून प्रत्येकाची असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो, संचालक प्रविमल अभिषेक, वाहतूक पोलीस अधीक्षक प्रबोध शिरवईकर, मोहिमेचे प्रमुख संदीप देसाई आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, ''दैनंदिन रस्ते अपघातात सरासरी एका व्यक्तीचा मृत्यू तर साधारण 10 लोक जखमी होतात. त्यांना गोवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ऑक्टोबरपर्यंत अपघाताच्या घटनांमध्ये 2 जणांचा अधिक मृत्यू झाल्याचे दिसून आले. मी सातत्याने म्हणत आलो आहे की, भिवपाची गरज ना... परंतु आता वाढते अपघात आणि रफ ड्रायव्हिंग पाहता खरंच घाबरण्याची गरज आहे. अपघात रोखणे ही केवळ सरकारची (Government) जबाबदारी नसून प्रत्येकाची आहे. दंड माफ करण्यासाठी लोक राजकीय पुढाऱ्यांशी संपर्क साधतात पण मी त्याचे समर्थन करत नाही.''

''दारु पिऊन गाडी चालवू नका, घरीच प्या''

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, "दारु पिऊन गाडी चालवू नका, दारु प्यायची असेल तर घरीच प्या किंवा बारमध्ये जाऊन दारु प्यायची असेल तर सोबत ड्राइव्हर ठेवा.'' याशिवाय, बसच्या चालकांना अल्कोमीटरचा वापर करावा लागेल आणि याबद्दलच्या सूचना आरटीओ आणि वाहतूक विभागाला दिल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.

तर तासाला एक अपघाती मृत्यू होईल!

राज्यात एका कुटुंबात जेवढ्या व्यक्ती आहेत त्यापेक्षा वाहने अधिक आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात अपघातांत वाढ होत आहेत. 2000 मध्ये सरासरी तीन दिवसांना एका व्यक्तीचा रस्ता अपघातात मृत्यू व्हायचा. नंतर दोन दिवसांना एक आणि आता दिवसाला एक मृत्यू होत आहे. आम्ही आताच जर पुढील पन्नास वर्षांचा विचार करुन योग्य पावले उचलली नाहीत तर येत्या काही वर्षांत तासाला एक अपघाती मृत्यू होईल. राज्यात रस्ता सुरक्षा संस्कृती रुजवणे काळाची गरज असल्याचे डॉ. मधु घोडकिरेकर यांनी यापूर्वी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT