CM Pramod Sawant: 'गोव्यातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा बिघडवाल तर याद राखा...'; मुख्यमंत्र्यांनी भरला सज्जड दम!

Religious And Social Harmony In Goa: राज्यातील धार्मिक व सामाजिक सलोख्याचे वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल, असा सक्त इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे.
CM Pramod Sawant: 'गोव्यातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा बिघडवाल तर याद राखा...'; मुख्यमंत्र्यांनी भरला सज्जड दम!
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यातील धार्मिक व सामाजिक सलोख्याचे वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल, असा सक्त इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे.

असे प्रयत्न मग ते कोणाकडूनही झाले तरी ते मुळीच खपवून घेतले जाणार नाहीत. येथे कोण चूक किंवा कोण बरोबर हा प्रश्न नाही, तर राज्याची शांतताप्रिय अशी ओळख बिघडवण्याचे हेतूतः प्रयत्न होत आहेत. या साऱ्यांवर सरकारची नजर आहे. कारवाई सुरू झाली की मग कोण कोणत्या विचारांचा आहे हेही पाहिले जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले.

CM Pramod Sawant: 'गोव्यातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा बिघडवाल तर याद राखा...'; मुख्यमंत्र्यांनी भरला सज्जड दम!
CM Pramod Sawant: 'माझंही शिक्षण...'; मराठीला अभिजात दर्जा मिळताच मुख्यमंत्री सावंतांकडून आनंद साजरा

सरकार चांगले काम करत आहे. या चांगल्या कामापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी असे प्रकार केले जातात. सरकार सर्वांना न्याय देणारे आहे. कायद्यासमोर सारे समान, तसे सरकारला सारेच एकसारखे. पोलिस आणि प्रशासनाच्या कार्यवाहीत सरकारने कधीच हस्तक्षेप केलेला नाही. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोचला पाहिजे, या अंत्योदय तत्त्वावर सरकार चालते. प्रशासनाला ग्रामोदय व अंत्योदय तत्त्वांची धोरणात्मक चौकट आखून दिली आहे. यात धार्मिक व सामाजिक द्वेषाला जागा नाही. धार्मिक व सामाजिक सलोख्यासाठी गोवा ओळखले जाते. त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. जो कोणी असे धाडस करेल, त्याने कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. कारवाई करताना कोणाचाही मुलाहिजा बाळगला जाणार नाही.

काणकोणमध्ये जुलूस काढण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. म्हापशात शक्तिप्रदर्शनही करण्यात आले. त्यानंतर आता सेंट झेवियर यांच्या पवित्र अवशेषांवरून वाद निर्माण केला जात आहे. त्याविषयी परस्परविरोधी तक्रारी झाल्या आहेत. राजकारण्यांनीही त्यावर भाष्य केल्याने तो वाद चिघळण्याची शक्यता उद्‌भवली आहे. वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिला आहे.

CM Pramod Sawant: 'गोव्यातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा बिघडवाल तर याद राखा...'; मुख्यमंत्र्यांनी भरला सज्जड दम!
CM Pramod Sawant: 'राज्यात धार्मिक तेढ निर्माण करु नका...', जुलूस वाद प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे आवाहन!

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

काहीजण मुद्दाम सामाजिक द्वेषाचे विष पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. या वाचाळवीरांवर आता कारवाई करण्याची वेळ आली आहे. सरकारला सारेच समान आहेत. त्यामुळे कारवाई करताना कोण कुठल्या विचारांचा, याचाही विचार होणार नाही. मुद्दाम इतिहासातील मुद्दे उकरून काढू नयेत. ते सरकार खपवून घेणार नाही.

सरकार आताच असंवेदनशील का? : सरदेसाई

मडगाव : यापूर्वी काहीजणांवर धार्मिक भावना दुखावल्‍याच्‍या आरोपाखाली कारवाई करणारे गोव्‍यातील भाजप सरकार आता सेंट फ्रान्‍सिस झेवियरविरोधात आक्षेपार्ह विधान केल्‍यानंतर कारवाई करण्‍यास असंवेदनशील का, असा सवाल गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.

जातीयवादी वक्तव्य करणाऱ्यांना अटक करा

बार्देश : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यावरील टिपणीला ‘सांप्रदायिक स्वरूपाचे विधान’ असे संबोधून काँग्रेसचे हळदोण्याचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी अशी विधाने संपूर्ण कॅथलिक समुदायाचा तसेच गोमंतकीयांचा अपमान करणारी आहेत, असे सांगितले. जातीयवादी वक्तव्य करणाऱ्यांना अटक करा, अशी त्यांनी मागणी केली.

CM Pramod Sawant: 'गोव्यातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा बिघडवाल तर याद राखा...'; मुख्यमंत्र्यांनी भरला सज्जड दम!
CM Pramod Sawant: खाणचालकांना मिळणार दिलासा! पूर्वलक्षी प्रभावाने कराचा विचार नाही; गोवा चेंबरच्या शिष्टमंडळाला 'CM'चे आश्‍वासन

कॉंग्रेसकडून हिंदू संघटना लक्ष्य

पणजी : राज्यात धार्मिक सलोखा राखणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. कॉंग्रेस मात्र आपल्या मतपेढीवर डोळा ठेवून हिंदू संघटनांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. हा विषय उकरून काढणाऱ्या चाणक्यांचा फुगा पणजी विधानसभा निवडणुकीत पाचशेही मते न मिळाल्याने फुटला आहे. भाजप कोणाचीही बाजू घेत नसून या विषयाकडे एकांगीपणे पाहता येणार नाही, असे वेर्णेकर म्हणाले.

CM Pramod Sawant: 'गोव्यातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा बिघडवाल तर याद राखा...'; मुख्यमंत्र्यांनी भरला सज्जड दम!
CM Pramod Sawant Cutbona Jetty Visit: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून कुटबण जेटीची पाहणी

डॉ. ऑस्‍कर रिबेलो, समाज कार्यकर्ते

जमीन रूपांतरे आणि आपली मौल्‍यवान भूमी बाहेरच्‍यांच्‍या घशात घालण्‍याचे कारस्‍थान सुरू असताना राज्‍यात धार्मिक वाद व रोमी लिपीचा वाद निर्माण करून लक्ष दुसरीकडे भरकटवण्‍याचे प्रयत्‍न सुरू आहेत. सुभाष वेलिंगकर यांनीही सेंट फ्रान्‍सिस झेविअर संदर्भात केलेले वक्‍तव्‍य याच स्‍वरूपाचे आहे. वेलिंगकर यांनी या भूमीची तत्त्‍वे समजून घेतली पाहिजेत आणि शुल्‍लक कारणावरून धार्मिक भावना भडकावण्‍याचा प्रयत्‍न करू नये. ही वेळ आहे, सर्वांनी एकजूट दाखवून गोव्‍याचे तत्‍व सांभाळण्‍याची! असे घडले नाही तर पुढच्‍या दहा वर्षात गोवा नष्‍ट होणार आहे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com