CM pramod sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: विश्वजीत राणे आणि माझ्यात मतभेद नाहीत; विरोधक आमच्यात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत...

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्पष्टीकरण; पैकुळ पुलाचे उद्घाटन

Akshay Nirmale

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्यातील संबंध चांगले नसल्याची चर्चा अधूनमधून होत असते. त्यावर आज, सोमवारी मुख्यमंत्री सावंत थेटच बोलले.

माझ्यात आणि विश्वजीत राणे यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री सावंत यांनी दिले. पैकुळ येथील पुलाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

(Paikul Bridge Inauguration)

मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र सरकारच्या साथीने राज्याचा विकास हाच राज्य सरकारचा ध्यास आहे. कुणीतरी माझ्यात आणि विश्वजीत राणे यांच्यात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधक आमच्यामध्ये मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत.

तथापि, मी आणि विश्वजीत राणे यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत, आम्ही दोघेही राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हा दोघांचेही काम सुरू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, राज्यात एखाद्या ठिकाणची जुनी इमारत पडली की त्यावर टीका करणे सोपे असते. पण राज्य सरकारने राज्यात गावागावात आरोग्य सुविधा उभारल्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष का करता?

गोव्यासारख्या आरोग्यसुविधा इतर कोणत्याही राज्यात नाहीत. नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: पर्यटन मंत्री खंवटे म्हणतात, 'टॅक्सी व्यावसायिकांना माफिया म्हणू नका'; गोवा आणि 'व्हिएतनाम'मधील फरकही केला स्पष्ट

'भारताने गोव्याची केलेली मुक्तता उच्चवर्णीय हिंदू राज्याने ख्रिश्चनांविरुद्ध केलेले युद्ध होते'; लेखिका अरुंधती रॉय

Shahid Afridi: राहुल गांधी चांगले व्यक्ती! शाहिद आफ्रिदीनं केलं कौतुक तर, भाजप सरकारवर केला मुस्लिम विरोधी राजकारणाचा आरोप

दया भाभी परतली! जेठालालच्या Nano Images सोशल मीडियावर Viral; दया-बबितामध्ये कोणाला निवडणार?

Team India New Jersey Sponsor: टीम इंडियाला मिळाला नवा 'जर्सी स्पॉन्सर', प्रत्येक सामन्यासाठी BCCIला देणार 4.5 कोटी

SCROLL FOR NEXT