Goa CM Pramod Sawant said International charter service will start soon Dainik Gomantak
गोवा

Goa: लवकरच आंतरराष्ट्रीय चार्टर सेवा सुरू होईल- मुख्यमंत्री

आंतरराष्ट्रीय चार्टर सहाय्य योजना 2021, टुरिझम बोर्डची स्थापना

दैनिक गोमन्तक

गोव्याचा पर्यटन (Goa Tourism) वाढीसाठी लवकरच आंतरराष्ट्रीय चार्टर सेवा (International charter service) सुरू होईल यासाठी ग्रह मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि विमान प्राधिकरणाशी पत्रव्यवहार झाला आहे. त्याची अंमलबजावणी  येत्या आठवड्यात होईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी दिली आहे . ते जागतिक पर्यटन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

पर्यटन खाते, पर्यटन विकास महामंडळ आणि पर्यटन संलग्न संस्थेच्या वतीने दोना पावला इथं पर्यटन दिनाच्या कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पर्यटन वृद्धीसाठीच्या चार योजनांचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले पर्यटन उद्योग गेल्या सहा महिन्यांपासून अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे आता यातून बाहेर पडण्यासाठी पर्यटन उद्योगासाठी लागणारे सर्व प्रकारची मदत राज्य सरकार करेल यासाठी राज्यात शंभर टक्के लसीकरण करणे आवश्यक असून 31 ऑक्टोबर पर्यंत लसीकरण झाल्यास राज्य देशातील पहिले सुरक्षित पर्यटन स्थळ बनेल आणि त्याचा लाभ पर्यटन उद्योगाला होईल.

यावेळी उपमुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री बाबू आजगावकर, पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्ष दयानंद सोपटे, पुढे बोलताना सावंत म्हणाले गोव्याचा पर्यटन वाढीसाठी परदेशातून लवकरच आंतरराष्ट्रीय चार्टर सेवा सुरू होईल यासाठी गृह मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि विमान प्राधिकरणाशी पत्रव्यवहार झाला आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच होईल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मोफत व्हिसाचा लाभही नव्या हंगामाची दोनशे कोटी रुपये खर्च केले जातील. 15 ऑगस्ट 2022 पर्यंत मोपा ग्रीनफिल्ड विमानतळ सुरू होईल आणि याचा लाभ पर्यटन वाढीला होईल नव्या पर्यटन हंगामामध्ये शॉक नोंदणीसाठी 50 टक्के सवलत दिली आहे तर सी आणि डी प्रकारच्या हॉटेल नूतनीकरण व नोंदणीसाठी 50 टक्के सवलत देण्यात आली आहे याचा लाभ घेऊन जनतेने घ्यावा.

योजनांचा शुभारंभ

  • टुरिझम बोर्डची स्थापना

  • पर्यटन गाईड प्रमाणपत्र योजना 2021

  • पर्यटन ग्रामविकास योजना 2021

  • पर्यटक व्यवसाय सहाय्य योजना 2021

  • आंतरराष्ट्रीय चार्टर सहाय्य योजना 2021

मुख्यमंत्र्यांच्या घोषणा

  1. पर्यटन व्यवसाय वाढीसाठी सरकारचे सर्वोतोपरी प्रयत्न

  2. दोनशे कोटी रुपयांच्या साधनसुविधा उभारणार

  3. 31 ऑक्टोबरपर्यंत 100 टक्के लसीकरण

  4. 15 ऑगस्ट 2022 पर्यंत मोपा विमानतळ सुरू

  5. शॉकसाठी 50 सवलत

  6. सी आणि डी प्रकारच्या हॉटेल नोंदणी नुतनीकरण्यासाठी 50 टक्के सवलत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

Viral Video: पैशांसाठी तरुणीला शिवीगाळ, MNS कार्यकर्ते आक्रमक; परप्रांतीय तरुणाला कार्यालयात बोलावून चोपलं

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

SCROLL FOR NEXT