CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Excise Scam in Goa: अबकारी घोटाळ्यातील सर्व रक्कम वसुल करणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

कडक कारवाई करणार असल्याचे आश्वासन

Akshay Nirmale

CM Pramod Sawant on Excise Scam in Goa: मद्यविक्री परवान्यांच्या नूतनीकरणातून परवानाधारकांची २ कोटी रूपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे.

अबकारी खाते खुद्द मुख्यमंत्र्यांकडे असल्याने याबाबत विचारणा केली असता, या घोटाळ्यातील सर्व रक्कम वसुल करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईळ. मला शंभर टक्के खात्री आहे की अबकारी आयुक्त या घोटाळ्यातील सर्व पैशांची वसुली करतील. जी कारवाई करणे गरजेचे आहे ती केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अबकारी खात्याच्या पेडणे कार्यालयात ही 2 कोटींची फसवणूक झाली होती. यात गुंतलेल्या वरिष्ठ कारकुनासह त्या कार्यालयातील आणखी काही कर्मचारी व अधिकाऱ्यांची या प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. फसवणूक झालेल्यांची जबानी घेतल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अबकारी खात्याकडे सुमारे 70 ते 80 तक्रारी आल्या आहेत. दरम्यान ज्या कारकुनावर या घोटाळ्याचा ठपका ठेवला आहे, त्याला त्वरित निलंबित न करता त्याची बदली केली गेली आहे. त्याच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT