CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: 'म्हादई'चा गळा काँग्रेसच्या नेतृत्वाने घोटला...

मुख्यमंत्री सावंत यांची टीका; डीपीआर मान्यता म्हणजे म्हादईच्या संपुर्ण प्रकल्पाला मान्यता नव्हे

Akshay Nirmale

CM Pramod Sawant: म्हादईच्या पाणी वळविण्याचा मुद्दा आत्ताचा नाही. काँग्रेसच्या सत्ताकाळात काँग्रेसने म्हादईचा गळा घोटण्याचे काम केले, खऱ्या अर्थाने म्हाईदचे डायव्हर्शन काँग्रेसच्या केंद्रातील तत्कालीन नेतृत्वाने केले आहे, असा आरोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. तेव्हा कुणी काही बोलले नाही, आता मात्र भाजप सरकारवर आरोप केले जात आहेत. म्हादई हा मुद्दा काही जणांसाठी राजकारणाचा आहे, असेही ते म्हणाले. 'गोमंतक'चे संपादक-संचालक राजू नायक यांच्या सडेतोड नायक या ‘गोमन्तक टीव्ही’च्या कार्यक्रमात ते बोलत होते. (Mahadayi Water Dispute)

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 2002 मध्ये तत्कालीन वाजपेयी सरकारने या कर्नाटकमध्ये या प्रकल्पाला परवानगी दिली नाही, असे काँग्रेसमधील काही नेते आज सांगत आहेत, ते खरेच आहे. 2008 ते 2012 या काँग्रेसच्या सत्ताकाळात कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवले आहे. तेव्हा केंद्रासह कर्नाटक आणि गोव्यातही काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळी कळसा प्रकल्पात कालवे बांधले आणि ते नंतर झाकले. तेव्हा काँग्रेसवाले गप्प राहिले. पण आता मात्र या मुद्यावरून राजकारण केले जात आहे. दरम्यान, यावेळी कळसा नदीतून कर्नाटकने पाणी वळविले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, म्हादई प्रश्न हा गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांचा आहे. या प्रकल्पातील 87 टक्के पाणी आणि भूभाग गोव्यात येतो. हा आंतरराज्य प्रश्‍न असल्याने तो सोडविण्यासाठी जल व्यवस्थापन प्राधिकरणाची गरज आहे. ही मागणी आम्ही जलशक्ती मंत्रालयाकडे लावून धरली आहे. येत्या आठ-दहा दिवसांत हे प्राधिकरण स्थापन व्हावे, यासाठी प्रयत्न केले जातील. सध्या पाणी वळवण्याच्या सुधारित प्रकल्प आराखड्याला जल आयोगाने मंजुरी दिली असली, तरी हा प्रश्‍न न्यायालयात नेणार आहे. तरी त्याला आणखीही मंजुऱ्या लागणार आहेत. पीआर मान्यता म्हणजे म्हादईच्या संपुर्ण प्रकल्पाला मान्यता नव्हे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT