Goa CM Pramod Sawant meets Finance Minister Nirmala Sitharaman twitter
गोवा

Goa CM meets Sitharaman: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa CM meets Sitharaman: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज, शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये गोव्यातील विविध विकास प्रकल्प आणि त्यासाठीच्या निधीबाबत चर्चा झाल्याचे समजते.

गोव्यात आगामी काळात होणाऱ्या विविध उपक्रमांसह राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी केंद्राचे पूर्ण पाठबळ राहिल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

नुकत्याच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गोव्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांचा दौरा काल, गुरूवारी आटोपून त्या परत दिल्लीला गेल्या. त्यानंतर आता गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्ली गाठली आहे. गुरूवारी रात्रीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्लीला रवाना झाले होते.

आज शुक्रवारी सकाळी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. गोव्याच्या विकासाच्या मुद्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सीतारामन यांच्याकडे निधीबाबत चर्चा केल्याचे समजते. इतर भाजप नेते आणि मंत्र्यांची मुख्यमंत्री भेट घेणार आहेत.

सध्या गोव्यातील म्हादई व्याघ्र प्रकल्प, आदिवासींना राजकीय आरक्षण हे विषय चर्चेत आले आहेत. तसेच नुकतेच कर्नाटकात सर्वपक्षीय बैठकीत म्हादईवरील कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी कर्नाटकातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार आहे.

शिवाय आगामी वर्षात लोकसभा निवडणूक होणार आहे. तसेच गोव्यातील मंत्रीमंडळातील फेरबदलही रखडले आहेत. यासाठीही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या अनेकदा दिल्ली वाऱ्या झाल्या आहेत.

त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सावंत यांचा हा दिल्ली दौरा महत्वाचा मानला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सावंत शुक्रवारी उशिरा दिल्लीतून गोव्यात परतणार असल्याचे समजते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT