Goa Dog Bite Cases: गोव्यात कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या साडेपाच वर्षात गोव्यात 95 हजार 902 कुत्रे चावण्याच्या घटना घडल्या आहेत. आरोग्य सेवा संचालनालया (डीएचएस) च्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, यावर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीत कुत्रा चावण्याच्या एकूण 8,700 घटनांची नोंद झाली आहे. गोव्यातील स्थानिक इंग्रजी माध्यमांनी डीएचएसच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.
या अहवालानुसार, 2013 मध्ये एकूण 12 हजार 857 प्रकरणे नोंदवली गेली. त्यानंतर राज्यात कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये 44 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2016 मध्ये एकूण 18 हजार 585 प्रकरणे नोंदवली गेली होती. जानेवारी ते मे 2017 पर्यंत राज्यात 9,094 प्रकरणे नोंदवली गेली.
2018 मध्ये राज्यात कुत्रा चावण्याची 22 हजार 527 प्रकरणे नोंद झाली होती. 2019 मध्ये कुत्रा चावण्याच्या 22 हजार 090 प्रकरणे नोंदली गेली. कोविड-19 महामारीच्या काळात कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये लक्षणीयरीत्या घट झाली होती.
2020 मध्ये कुत्रा चावण्याच्या घटनांची संख्या 9,556 नोंदवली गेली आणि 2021 मध्ये ती 9,126 झाली.
राज्य प्रशासनाने कोविड-संबंधित निर्बंध उठवल्यानंतर अशी प्रकरणे पुन्हा वाढली. 2022 मध्ये एकूण 23,903 प्रकरणे नोंदवण्यात आली. हा डेटा DHS द्वारे सरकारी रुग्णालये, आरोग्य केंद्रे, खाजगी रुग्णालये आणि खाजगी डॉक्टरांवर नोंदवलेल्या प्रकरणांमधून गोळा केला आहे.
काही दिवसांपुर्वीच गोव्यातील ताळगाव येथे रॉटवेलर कुत्र्याच्या हल्ल्यात दोन लहान भावंडे जखमी झाली होती. या घटनेनंतर संताप व्यक्त होत होता. दोन्ही चिमुरड्या बहिण-भावाला कुत्र्याच्या हल्ल्यात दुखापत झाली होती. या हल्ल्यावेळी या मुलांची आई बेशुद्ध पडली होती.
दरम्यान, तक्रारीनंतर संबंधित कुत्र्याच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणात रितसर कायदेशीर कारवाई केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.