Goa CM Dr. Pramod Sawant And Health Minister Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

चलो बुलावा आया है...! गोव्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना दिल्लीत येण्याचे आदेश, कारण गुलदस्त्यात

Goa Politics: राज्यातील 22 हजार बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे वक्तव्य मंत्री राणे यांनी एका जाहीर सभेत केले होते.

Pramod Yadav

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) हायकमांडने सोमवारी नवी दिल्लीत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

हायकमांडच्या आदेशानुसार मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि आरोग्यमंत्री राणे दिल्लीत महत्वाच्या बैठकीसाठी रवाना झाले आहेत. दोघांच्या तातडीने दिल्लीला का बोलावण्यात आले आहे याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सावंत आणि राणे यांना केंद्रीय मंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भेटीसाठी बोलवले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना त्यांच्या दिल्ली भेटीबद्दल विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

या भेटीचे कारण अद्याप समोर आलेले नाही पण, राणे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यानंतर ही राजकीय घडामोड होत असल्याने विविध चर्चांणा उधान आले आहे.

राज्यातील 22 हजार बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे वक्तव्य मंत्री राणे यांनी एका जाहीर सभेत केले होते.

मुख्यमंत्री सावंत यांनी मंत्री राणे यांच्या वक्तव्यावर भाष्य करण्यास नकार दिला होता. पण, सरकार राज्यातील तरुणांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

राणे यांच्या वक्तव्यामुळे गोवा भाजपमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा गटबाजी निर्माण होऊ नये यासाठी केंद्रीय नेतृत्वाने दोन्ही नेत्यांना दिल्लीत बोलावल्याचे मानले सांगितले जात आहे.

दरम्यान, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मुख्यमंत्री सावंत यांनी दिल्लीतील बैठकीसाठी जात असल्याचे सांगितले असले तरी त्यांनी राणेंच्या भेटीवर भाष्य करण्यास टाळले. तसेच, राणेंची यावर प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

Fire Case: आगीपूर्वी घराजवळ बादली घेऊन आलेला कोण? 2 मिनिटांत बादलीशिवाय परतला; दमोने कुटुंबातील सहा मृत्यूंच्या तपासाला नवे वळण

Santinez Footpath Damage: स्मार्ट सिटीच्या रस्त्यालगत खोदलेले पदपथ ‘जैसे थे’; जलवाहिनी जोडणी झाली, मात्र खड्डे न बुजवल्याने पादचाऱ्यांना धोका

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा आरोप; 90 लाखांचे दागिने-रोकड घेतल्याप्रकरणी खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग

Investment Fraud: 20.83 कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याला नवे वळण; सुनावणीला गैरहजर राहिल्याने सुनीता रॉड्रिग्जविरुद्ध अटक वॉरंट

SCROLL FOR NEXT