CM Pramod Sawant गोव्यात ज्या आरोग्य सुविधा जनसामान्यांना मिळतात, त्यात देशात कुठेही मिळत नाहीत. त्याचबरोबर शिक्षणातही गोवा पहिल्या क्रमांकावर आहे.
बालवाडी ते पीएचडीपर्यंतच्या शिक्षणाची गोव्यात सोय आहे. त्यामुळेच देशात आपले राज्य ‘माॅडर्न गोवा’ म्हणून नावाजले जात आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या प्रयत्नातून पर्ये मतदारसंघात १०० कोटी रुपयांची विविध विकासकामे होणार आहेत. त्याचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.
मोर्ले काॅलनी येथील समाज सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास वीजमंत्री सुदिन ढवळीकर, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार डाॅ. दिव्या राणे तसेच पंच, सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य, अभियंते, विविध खात्यातील कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
पर्ये मतदारसंघाच्या आमदार डाॅ. दिव्या राणे यांची आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी सतत धडपड असते. त्यामुळे आज एकाच दिवशी १०० कोटींच्या विकासकामांचा त्यांच्या मतदारसंघात शुभारंभ झाला आहे.
सत्तरी तालुका आता ग्रामीण राहिलेला नाही. हे येणाऱ्या पिढीसाठी चांगली गोष्ट आहे. सत्तरीच्या विकासासाठी आपला डाॅ. दिव्या राणे यांना सदैव पाठिंबा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
‘स्विगी’शी करार
ज्या महिला सणासुदीच्या काळात खाद्यप्रदार्थ बनवितात त्यांना रोजगार देण्याची संधी देण्यात येणार आहे. यासाठी आम्ही स्विगीशी करार केला आहे. या योजनेंतर्गत महिलांना त्यांच्या खाद्यपदार्थांसाठी घरबसल्या पैसे मिळणार आहेत आणि याची सुरवात उद्याच केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.