Kadamba Buses Without Conductor: आता कंडक्टरविना कदंबा! पण त्यांच्या नोकरीचं काय?

कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आता लवकरच पॉइंट-टू-पॉइंट बस सेवा सुरू करणार आहे.
Kadamba Buses Without Conductor
Kadamba Buses Without ConductorDainik Gomantak
Published on
Updated on

Kadamba Buses Without Conductor: कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आता लवकरच पॉइंट-टू-पॉइंट बस सेवा सुरू करणार आहे. यामध्ये GoaMiles अॅपद्वारे तिकीट बुक करणे तसेच QR कोड द्वारे तिकीट बुक करणे यासारखे ऑनलाइन पर्याय वापरता येणार आहेत. बस कंडक्टरशिवाय आता या बसेस धावणार आहेत.

कदंब व्यवस्थापनाने गोवामाइल्स अॅपवर बस ट्रॅकिंग आणि तिकीट बुकिंग सुविधेशिवाय त्यांच्या बस सेवेचे वेळापत्रक आधीच अपलोड केले आहे. प्रवाशांना त्यांच्या फोनद्वारे ॲडव्हान्स तिकीट बुक करता येणार आहे. तसेच, यासाठी क्यूआर कोडचाही वापर करता येणार आहे.

Kadamba Buses Without Conductor
Archbishop Cardinal Philippe Neri Ferrao: भारतीय जनता पक्षातर्फे आर्च बिशपांचे अभिनंदन

केटीसीएलच्या सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करणार्‍या हजारो प्रवाशांना या पर्यायांचा लाभ मिळत असल्याने टप्प्याटप्प्याने या बस कंडक्टरशिवाय चालवल्या जातील, असे केटीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक संजय घाटे यांनी सांगितले.

घाटे म्हणाले की, जे प्रवासी अॅप वापरत नाहीत त्यांना त्यांचे बस भाडे बसचालकाला देण्याचा पर्यायही उपलब्ध असेल. सध्या कदंबच्या 520 बसेस आहेत, यापैकी 437 डिझेल आणि आणखी 83 इलेक्ट्रिक बसेस आहेत.

GoaMiles अॅपद्वारे बसचे उपलब्ध वेळापत्रक आणि तिकीट भाडे ऑनलाईन भरण्याचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे इथून पुढे बसमधील कंडक्टर हळूहळू कमी दिसतील, असे घाटे यांनी सांगितले.

त्यांच्या मते, ग्रामीण भागातील प्रवाशांना त्यांच्या मार्गावरील बसच्या वेळापत्रकाची माहिती नसते आणि ते सहसा बस-स्टॉपवर जातात आणि बससाठी बराच वेळ प्रतीक्षा करतात. ही समस्या दूर करण्यासाठी महामंडळाने 'लाइव्ह बस ट्रॅक' हे हा पर्याय अॅपमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, व्यवस्थापनाच्या रोस्टरवरील सुमारे 700 कंडक्टर्सच्या नोकऱ्या सुरू असल्याने त्यांना काळजी करण्याची गरज नाही कारण त्यांना विविध बसस्थानकांवर तिकीट तपासण्याची कामे दिली जातील. ते निवृत्त होईपर्यंत त्यांची छाटणी केली जाणार नाही, असेही घाटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com