गोव्यात कोविडच्या ओमिक्रोन व्हेरिएंटची (Omicron variant) पाच संशयित प्रकरणे आढळून आली असतानाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी गोव्यातील (Goa) जनतेला घाबरवू नये, त्यांना आपली काळजी घेण्याचे, लस घेण्याचे आवाहन करावे असे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. तसेच राज्यातील 1.20 लाख रहिवाशांना ज्यांनी दुसरा झटका घेतला नाही, त्यांना लसीकरण पुर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
"गोव्यात ओमिक्रॉन संशयित आढळले असून त्याचा जिनोम सिक्वेन्सिंग अहवाल सध्या आलेला नाही, म्हणून त्यांचा वारंवार उल्लेख करून राज्यात भीतीदायक परिस्थिती निर्माण करू नका. मी सतत परिस्थितीचा पाठपुरावा घेत आहे," असे सावंत म्हणाले.
ओमिक्रॉन व्हेरियन्टचे रुग्ण भारतात आढळल्यानंतर चिंता वाढली होती. त्यामुळे सुरक्षा आणि उपाययोजनेचा भाग म्हणून केंद्र सरकारने 12 देशांतील प्रवाशांवर विविध प्रकारची बंधने घातली. त्या प्रमाणे रशियाच्या जहाजातून गोव्यात आलेल्या तीन रशियन आणि जॉर्जियन व्यक्तींच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्यानंतर हे पाच जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. यापैकी चौघांना कोरोनाची कोणतीच लक्षणे नाहीत. सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णाला जहाजावरच अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आणि इतर चौघांना कासावलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अलगीकरण सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. जिनोम सिक्वेलचे नमुने पुण्याच्या लॅबकडे पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पत्रकारांना दिली. .
कोविड लसीकरणाचा दुसरा डोस न घेतलेल्या 1.20 लाख गोवावासीयांनी शक्य तितक्या लवकर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन सावंत यांना केले. येत्या 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिनी देशाचे पंतप्रधान अनेक प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी गोव्यात येणार आहेत.
"आम्हाला खबरदारी घ्यायची आहे यात शंका नाही, पण गोव्यातील जनतेला घाबरविण्याची परिस्थिती निर्माण करू नये. 1.20 लाख गोवावासीयांनी दुसरा डोस घेतला नाही. त्यांनी तो घ्यावा. 19 डिसेंबरपर्यंत गोव्याला 100 टक्के लसीकरण झालेले राज्य म्हणून घोषित करायचे आहे. हे आमचे लक्ष्य आहे, लोकांनी आम्हाला ते साध्य करण्यासाठी मदत केली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात येण्यापूर्वी दुसरा डोस घ्या," असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी गोवा वासियांना केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.