गोव्याच्या नीलेशने दुबईत हरवले मृत्यूला

नीलेश सदानंद मडगावकर (Nilesh Sadanand Madgaonkar) असे या 42 वर्षीय अनिवासी भारतीयाचे (Indian) नाव आहे.
गोव्याच्या नीलेशने दुबईत हरवले मृत्यूला
गोव्याच्या नीलेशने दुबईत हरवले मृत्यूलाDainik Gomantak

दुबई: तब्बल 54 दिवस दुर्मीळ व प्राणघातक जीवाणू संसर्गाशी झुंज देत अनिवासी भारतीयाने (Indian) अखेरीस मृत्यूला हरविले. नीलेश सदानंद मडगावकर (Nilesh Sadanand Madgaonkar) असे या 42 वर्षीय अनिवासी भारतीयाचे (Indian) नाव आहे. तो मूळचा गोव्याचा (Goa) असून चालक आहे. त्यांना सेपेशिया सिंड्रोम हा दुर्मीळ जीवाणू संसर्ग झाला होता. सुमारे 75 टक्के मृत्यूदर असलेल्या या संसर्गातून ते आश्चर्यकारकरीत्या बचावले, असे डॉक्टरांनी सांगितले.

गोव्याच्या नीलेशने दुबईत हरवले मृत्यूला
गोव्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव?

नीलेश मडगावकर गेल्या 27 वर्षांपासून संयुक्त अरब अमिरातीत राहतात.वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मधुमेहाचेही निदान झाले. त्यांच्या हृदयाची गती वाढली होती तसेच फुफ्फुसांनाही सूज आली होती. डॉ. नियास खलिद यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने प्रतिजैवकांच्या सोबत बुरशीनाशक औषधे, स्टेरॉईड्‌स दिले. एक महिन्यांच्या उपचारानंतर नीलेश यांची प्रकृती सुधारली. संसर्गाला त्यांनी 54 दिवसांच्या लढाईनंतर हरविले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com