CM Sawant Handed over 4 houses to extreamly needy people  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: आनंदाने डोलू लागली 4 निराधार कुटूंबे; 'भाजयूमो'ने बांधून दिले हक्काचे घर

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या वाढदिनी केला होता संकल्प

Akshay Nirmale

CM Pramod Sawant: गोव्यातील डिचोली तालुक्यातील चार निराधार कुटूंबाना घरे बांधून देण्याची किमया भारतीय जनता युवा मोर्चा या भारतीय जनता पक्षाच्या युवा शाखेने केली आहे. त्यामुळे या चार कुटूंबांना हक्काचा निवारा मिळाला असून आज, मंगळवारी या घरांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते संबंधितांना वितरण करण्यात आले. त्यानंतर ही निराधार कुटूंबे आनंदाने जणू डोलू लागली होती..

भारतीय जनता युवा मोर्चाच्या गोवा शाखेने या चार निराधार कुटूंबांना हक्काचे घर बांधून देण्याची जबाबदारी घेतली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा 50 वा वाढदिवस यंदा 24 एप्रिल रोजी साजरा झाला होता. तेव्हा भाजयूमो गोवा शाखेने हा संकल्प केला होता. आज, त्या संकल्पाची पुर्ती झाली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजयुमो गोवा शाखेचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, चार निराधार कुटूंबांना त्यांचे हक्काचे घर देताना मला आज खूप आनंद होत आहे. भाजयूमो गोवा शाखेने दाखवलेली सामाजिक बांधिलकी खूप महत्वाची आहे.

या घरांमुळे या निराधार कुटूंबियांच्या जीवनात खूप मोठा फरक पडणार आहे. त्यांच्या आयुष्यात ही घरे खूप लाभदायी ठरणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी या सामाजिक कार्यासाठी भाजयूमो चे आभार मानले.

या वेळी मयेचे आमदार पेमेंद्र शेट, गोवा भाजपचे जनरल सेक्रेटरी दामू नाईक, भारतीय जनता यूवा मोर्चा गोवा शाखेचे अध्यक्ष समीर मांद्रेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT