CM Pramod Sawant on Udhayanidhi Stalin Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: सनातन धर्मावरून प्रमोद सावंत यांची तामिळनाडुचे मंत्री उदयनिधींवर टीका; संघटीत होण्याचे आवाहन

सनातन धर्म डेंग्यू, मलेरियासारखा असून समूळ नष्ट करण्याचे वक्तव्य उदयनिधी यांनी केले होते.

Akshay Nirmale

CM Pramod Sawant on Udhayanidhi Stalin: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पक्षाचे नेते स्टॅलिन यांचे आमदारपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर टीका केली आहे. उदयनिधी हे राज्यात मंत्री देखील आहेत.

आमदार उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यानंतर ते हिंदुत्ववाद्यांच्या टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत. हिंदुत्ववादी विचारांच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीका होत आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, अखेर इंडिया आघाडीतील हिंदु धर्माबाबत खरा द्वेष उफाळून बाहेर आला आहे.

पिशवीतून मांजर बाहेर पडली आहे. उदयनिधी स्टॅलिन यांचे वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आहे. त्यांचे वक्तव्य दुष्ट आहे.

सावंत यांनी म्हटले आहे की, सनातन धर्म 'नित्य नूतन' आत्मसात करण्याची आणि काळानुसार बदलण्याची आणि सत्याच्या शोधासाठी प्रत्येकाला स्वतःच्या मार्गावर चालण्याची मुभा देणारा भाव प्रतिबिंबित करणारा धर्म आहे.

उदयनिधी स्टॅलिन आणि त्यांच्या आघाडीचे दुष्ट हेतू यातून समोर आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, आपण स्वामी विवेकानंद यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे आणि भारताच्या चिरंतन हितासाठी सनातन धर्माच्या भावनेचे रक्षण, जतन केले पाहिजे.

त्यासाठी उठा, जागे व्हा आणि संघटित व्हा, असे आवाहन सावंत यांनी केले आहे. त्यांनी 'धर्मो रक्षित:' असे म्हणत आपल्या ट्विटचा शेवट केला आहे.

काय म्हटले होते उदयनिधी स्टॅलिन?

मंत्री उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते की, सनातन धर्म संपवून टाकला पाहिजे. सनातन धर्म मलेरिया, डेंग्यूसारखा आहे. त्यामुळे तो संपवणे गरजेचे आहे. काही गोष्टींचा विरोध करणे खूप गरजेचे असते. अशा गोष्टी समूळ नष्ट केल्या पाहिजेत.

मच्छर, डेंग्यू, मलेरिया, कोरोना या अशा गोष्टी आहेत, ज्यांचा केवळ विरोध करून भागणार नाही, तर त्यांना संपवले पाहिजे. सनातन धर्मदेखील अशी गोष्ट आहे.

वक्तव्य व्हायरल

त्यांचे वक्तव्य सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. त्यावरून अनेक उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सोशल मीडियातूनही त्यांना ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियात उदयनिधी यांच्या वक्तव्यावरून दोन गट पडले आहेत. एक गट त्यांच्यावर टीका करत आहे तर दुसरा गट त्यांचे समर्थन करत आहे.

अभिनेता, दिग्दर्शक

उदयनिधी हे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री आहेत. तसेच ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक देखील आहेत. अलीकडच्या काळात त्यांचा 'मामनन' हा चित्रपट चर्चेत आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: धन, यश आणि प्रगती! नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 3 राशींसाठी महायोग, वाचा तुमचं राशीभविष्य

IFFI 2025: वाहतूक कोंडी करून, सर्वसामान्यांना त्रास देऊन 'इफ्फी'चे उदघाटन का केले?

Sholay Bike At IFFI: ..ये दोस्ती हम नहीं तोडेंगे! इफ्फीमध्ये 'शोले'मधील बाईकचा जलवा; फोटो खेचण्यासाठी होत आहे तुफान गर्दी

17 वर्षांनंतर हरवलेला मुलगा आई-वडिलांच्या मिठीत, कुटुंबात आनंदाचं वातावरण; जाणून घ्या संपूर्ण कहाणी

Suryakumar Yadav Captain: 'मिस्टर 360' च्या हाती कमान! सूर्यकुमार यादव करणार मुंबई संघाचे नेतृत्व

SCROLL FOR NEXT