CM Pramod Sawant: गोव्याच्या किनारी भागात परप्रांतीय बोगस डॉक्टर कार्यरत; त्यांच्याकडून परदेशी पर्यटकांची लूट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत; तक्रारींसाठी पुढे येण्याचे आवाहन
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant: गोव्याच्या किनारी भागात दातांवर उपचार करणारे काही बोगस डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांच्यावर कारवाईसाठी तक्रार गरजेची आहे. तक्रारींसाठी पुढाकार घ्या, कारवाई केली जाईल, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

CM Pramod Sawant
Goa Monsoon 2023: गोव्यात आत्तापर्यंत 2,780 मिलीमीटर पाऊस; दोनदा पर्जन्यविराम तरीही गाठली सरासरी

ते म्हणाले की, किनारी भागात असे बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचे कळते. असोसिएशनने तक्रारीसाठी पुढाकार घ्यावा. तक्रार दाखल केली पाहिजे. तक्रार असेल तर सरकारला कार्यवाही करता येते. हे सर्व बोगस डॉक्टर परप्रांतीय आहेत.

परदेशी पर्यटकांची मोठी लुबाडणूक या बोगस डॉक्टरांकडून होत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. त्यांच्यावर कडक कारवाई गजरेची आहे. तथापि, त्यासाठी तक्रारींसाठी लोकांनी, असोसिएशनने पुढाकार घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.

दरम्यान, किनारी भागात अनेक बोगस डॉक्टरांनी आपले बस्तान मांडल्याचे कळते. बिनदिक्कत या बोगस डॉक्टरांची दुकानदारी सुरू असल्याचे कळते. त्यातून सर्वसामान्यांची लूट केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
cm pramod sawant
Goa Cabinet Expansion Updates
Goa maritime development project
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com