घरमालक कुटूंबासह गोव्यात ट्रीपवर; नोकर घरातील लाखोंचे दागिने घेऊन पसार...

हिरेजडीत सोन्याच्या अंगठ्या, बांगड्या दागिने घेऊन नोकर फरार
Jodhpur News
Jodhpur News Dainik Gomantak
Published on
Updated on

Jodhpur Crime: देशभरातून गोव्याकडे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. तथापि, राजस्थानमधील एका पर्यटकाला मात्र एका वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले आहे.

मूळचा जोधरपूरचा हा पर्यटक कुटूंबासमवेत गोवा एन्जॉय करायला गोव्यात आलेला असतानाच त्याच्या नोकराने घरातील लाखो रूपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस झाली आहे.

Jodhpur News
Vijai Sardesai: लोकसभा निवडणुकीच्या निकालापेक्षाही राज्यात जातीय सलोखा असणे जास्त महत्वाचे...

जोधपूर पोलीस आयुक्तालय एरियातील शास्त्रीनगर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. हरिश राहूल अग्रवाल असे या पर्यटक घरमालकाचे नाव आहे. तो दिल्ली आणि गोवा फिरायला बाहेर पडलेला.

घरमालक कुटूंबियांसह बाहेर गेल्याची संधी साधून आरोपींनी घरातील लाखोंच्या दागिन्यांवर हात मारला. दरम्यान, अग्रवाल यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, ते शास्त्रीनगर येथे राहतात.

मूळचा बिहारमधील मधौली येथील रहिवासी असलेला अशोक कुमार हा त्यांच्या घरी नोकर म्हणून कामास होता. काही दिवसांपूर्वी अग्रवाल हे त्यांच्या कुटुंबासह दिल्ली आणि गोव्याला गेले फिरण्यासाठी गेले होते.

त्यांचे आई-वडील मात्र घरी होते. ही संधी साधून आरोपींनी घरातून सोन्याचे दागिने व महत्वाची कागदपत्रे चोरून नेली.

Jodhpur News
CM Pramod Sawant: गोव्याच्या किनारी भागात परप्रांतीय बोगस डॉक्टर कार्यरत; त्यांच्याकडून परदेशी पर्यटकांची लूट

अग्रवाल यांनी म्हटले आहे की, त्यांचे तसेच त्यांच्या पत्नीचे दागिने रूमच्या स्टोअर रूमच्या कपाटात ठेवले होते. ज्यामध्ये डिजिटल लॉक लावण्यात आले होते.

ते घरी परतले असता त्यांना कळले की त्यांच्या घरात काम करणारा नोकरही 23 जुलै 2023 रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास न सांगता घरातून निघून गेला होता.

त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी जेव्हा त्यांच्या पत्नीने कपाट उघडले तेव्हा तेथील दागिने गायब होते. यात त्यांची एक हिरेजडीत सोन्याची अंगठी, पत्नीच्या हिऱ्यांनी जडवलेल्या दोन सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या, कानातले आणि हिरे जडलेले सोन्याचे दागिने इतके दागिने होते.

हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सध्या पोलिस संबंधित नोकराचे लोकेशन तपासत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com