Chief Minister Pramod Sawant criticized Arvind Kejriwal
Chief Minister Pramod Sawant criticized Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

Swati Maliwal Assault Case: ‘’दिल्लीचे मुख्यमंत्री गप्प का, विभवने मोबाईल फॉरमॅट केला...’’; केजरीवालांच्या मौनावर गोव्याचे CM बरसले

Manish Jadhav

Swati Maliwal Assault Case: आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत झालेले गैरवर्तन आणि मारहाण प्रकरण सध्या दिल्लीच्या राजकारणात चांगलंच गाजत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भाजप कडून घेरले जात आहे. यावेळी भाजपला कुमार विश्वास यांची आठवण झाली. भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सांवत आणि सुधांशू त्रिवेदी यांनी केजरीवालांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, "केजरीवालांचा पक्ष स्वाती मालीवाल यांच्यासोबत आता ज्या प्रकारे वागत आहे, असाच कुमार विश्वास यांच्यासोबत वागला होता."

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, "मी जेव्हा दिल्लीत लोकांना भेटतो तेव्हा ते मला विचारतात की अरविंद केजरीवाल 9 दिवसांपासून स्वाती मालीवाल प्रकरणात काहीच का बोलत नाहीत. मात्र केजरीवाल यांचे मौनच सर्व काही सांगून जाते."

ते पुढे म्हणाले की, “केजरीवालांचा पक्ष आता दिल्लीविरोधी आणि महिलाविरोधी बनला आहे. आप खासदार संजय सिंह जेव्हा पत्रकार परिषद घेतात तेव्हा ते स्वाती मालीवाल यांच्याबाबतीत जे काही घडले ते मान्य करतात. दरम्यान, मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन घडल्याच्या तीन दिवसांनंतर अरविंद केजरीवाल विभव कुमारला त्यांच्या कारमधून लखनऊला घेऊन गेले होते. जर विभव कुमारचा या प्रकरणात कोणताही सहभाग नसेल तर त्याने फोन फॉर्मेट का केला?’’

विभव कुमारचा उल्लेख करण्यात आला

मुख्यमंत्री सावंत पुढे असेही म्हणाले की, ‘’केजरीवाल यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही फुटेज गायब होणे आणि विभव कुमारला तिथे लपवून ठेवणे यावरुन त्याचा (विभव कुमार) या प्रकरणात हात असल्याचे दिसून येते.’’

दरम्यान, स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी विभव कुमार विरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 354 (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर हल्ला करणे किंवा बळजबरी करणे), कलम 506 (धमकी देणे), कलम 509 ( महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान करण्याच्या उद्देशाने हावभाव करणे) आणि कलम 323 (हल्ला करणे) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sal News : साळ येथे झाडे पडून मोठे नुकसान, घराचे पत्रे तुटले

Bicholim News : व्हाळशीतील मगर अखेर पिंजऱ्यात; बोंडलात रवानगी

Goa And Konkan Today's Live News: लाला की बस्तीमध्ये वैध कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या दहा जणांना अटक

Yoga Day 2024 : ‘युवा’च्‍या योग शिबिराला उदंड प्रतिसाद; १४० जणांनी घेतला लाभ

South Goa: संविधानविरोधी वक्तव्य करणारे विरियातो निवडून येणे हे लोकशाहीचे अपयश - हिंदू जनजागृती समिती

SCROLL FOR NEXT