Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Swati Maliwal Assault Case: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील राजकारण चांगलेच तापले आहे.
Aap Leader Atishi Marlena
Aap Leader Atishi MarlenaDainik Gomantak

Swati Maliwal Assault Case: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील राजकारण चांगलेच तापले आहे. आम आदमी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आतिशी यांनी स्वाती मालीवाल यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टिकास्त्र डागले. हे प्रकरण भाजपचे षड्यंत्र आहे. स्वाती मालीवाल या कटाचा चेहरा आणि मोहरा असल्याचे आतिशी यांनी सांगितले. स्वाती मालीवाल 13 मे रोजी अपॉइंटमेंट न घेता मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचल्या होत्या. मुख्यमंत्री केजरीवाल यांना गोवण्याचा त्यांचा हेतू होता. परंतु केजरीवाल मुख्यमंत्री निवासस्थानी नसल्याने त्यांचा कट फसला. त्यानंतर स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार यांच्यावर आरोप केले. परंतु आज समोर आलेल्या व्हिडिओने त्यांचा पर्दाफाश केला, असे अतिशी म्हणाल्या.

आतिशी यांनी स्वाती यांना भाजपचे प्यादे म्हटले

आप नेत्या आतिशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन स्वाती मालीवाल आणि भाजपवर गंभीर आरोप केले. अतिशी म्हणाल्या की, ‘’अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यापासून भाजप दहशतीत आहे. या गोंधळातच हा कट रचण्यात आला. या कटांतर्गत स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले.’’

Aap Leader Atishi Marlena
Swati Maliwal: दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा विनयभंग!

13 मे रोजी काय घडले?

दरम्यान, 13 मे च्या संपूर्ण घटनेबद्दल सांगताना आतिशी म्हणाल्या की, ‘’स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत त्यांना मारहाण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आपले डोके टेबलावर आदळले. त्यानंतर कपडे फाटले, परंतु समोर आलेला व्हिडिओ याच्या उलट चित्र दर्शवतो. स्वाती मालीवाल मोठ्या आवाजात विभव कुमारवर ओरडत आहेत. त्यांचे कपडे फाटलेले नाहीत आणि डोक्याला दुखापतही झालेली नाही. आजच्या व्हिडिओने स्वाती मालीवाल यांचे आरोप निराधार सिद्ध केले आहेत. विभव कुमार यांनी त्यांच्या तक्रारीत 13 मे च्या घटनेविषयी तपशीलवार सांगितले आहे.’’

Aap Leader Atishi Marlena
Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्यासाठी दिलासा मागणं पडलं महागात; HC ने ठोठावला 75 हजारांचा दंड

विभव कुमार यांना मोठ्या आवाजात बोलल्या

आतिशी यांच्या म्हणण्यानुसार, ‘’स्वाती मालीवाल यांनी गेटवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना धमकावले. त्या म्हणाल्या की, त्या राज्यसभेच्या खासदार आहेत, जर त्यांनी त्यांना थांबवले तर ते नोकरीला मुकतील. पोलिसांशी झटापट करुन त्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात दाखल झाल्या. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना पुन्हा अडवून वेटिंग रुममध्ये बसवले. काही वेळ वेटिंग रुममध्ये बसल्यानंतर स्वाती मालीवाल मुख्यमंत्र्यांच्या ड्रॉईंग रुममध्ये गेल्या आणि मुख्यमंत्र्यांना फोन करुन आता भेटायला सांगू लागल्या. त्याचदरम्यान मुख्यमंत्री निवासस्थानातील कर्मचाऱ्यांनी विभव कुमार यांना तात्काळ फोन केला, ते 10 मिनिटांनी निवासस्थानी पोहोचले. त्यांनी स्वाती मालीवाल यांना सांगितले की, आज मुख्यमंत्री त्यांना भेटू शकणार नाहीत. त्यानंतर स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार यांच्यावर मोठ्या आवाजात बोलून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न सुरु केला. दरम्यान, विभव कुमार यांनी त्यांना आत जाण्यापासून रोखल्यावर त्यांनी त्यांना ढकलले आणि आत जाण्याचा प्रयत्न करु लागल्या.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com