Goa Budget 2024-25 | Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Budget: पोर्तुगीजांनी उध्वस्त केलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि सेंट झेवियर्स एक्सपोझेशनसाठी 30 कोटी

Goa Budget 2024-25: 26,855 कोटी रुपयांच्या या अर्थसंकल्पात अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत

Pramod Yadav

Goa Budget 2024-25: गोवा राज्याचा आर्थिक वर्ष 2024-25 साठीचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवार (दि.08) सादर केला. 26,855 कोटी रुपयांच्या या अर्थसंकल्पात अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या योजना आणि कार्यक्रमांसाठी ठोस तरतूद करताना अर्थमंत्री सावंत यांनी पुरातत्व खात्याच्या अंतर्गत पोर्तुगीजांनी उद्घवस्त केलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि सेंट झेवियर्स एक्सपोझेशनसाठी भरगोस तरतूद केली आहे.

पोर्तुगीजांनी उध्वस्त केलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विविध कार्यक्रमात सातत्याने भाष्य केले आहे. दरम्यान, गुरुवारी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी 20 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

पोर्तुगीजांनी गोव्यातील जवळपास 900 मंदिरे उध्वस्त केली आहेत. या सर्व मंदिरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 20 कोटी रुपये खर्चून राज्यात एक स्मृती मंदिर उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

येत्या काही दिवसात या मंदिरासाठी जागा निश्चित करून त्याच्या बांधकामाचे काम सुरु करण्यात येणार आहे. पुढच्या 2 वर्षात हे काम पूर्ण करण्याचे ध्येय सरकारने समोर ठेवले आहे.

याशिवाय जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्चच्या एक्सपोझेशन कार्यक्रमासाठीही 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

अर्थसंकल्पात महिलांसाठी 30 टक्के तरतूद

देशातील महिलांच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून केंद्राने यावर्षी नारीशक्तीचा नारा दिला. केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून भरघोस तरतूद केल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या एकूण अर्थसंकल्पात महिलांसाठी 30 टक्के तरतूद केल्याचे सांगितले.

सर्व विभागात महिलांसाठी 30 टक्के तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय येणाऱ्या प्रत्येक अर्थसंकल्पात ही तरतूद कायम राहील असेही त्यांनी सांगितले. राज्यातील महिलांचा सर्वांगीण विकास तसेच त्यांचे विविध क्षेत्रातील योगदान वाढविण्यसाठी सरकार प्रयत्नशील राहील असेही ते म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT