Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa CM: मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे वजन वाढले! गोविंद गावडेंना त्यानींच हटवल्याचे दिले स्पष्टीकरण, अनेकांचे धाबे दणाणले

Goa Politics News: कला आणि संस्कृती आणि क्रीडा खाते सांभाळणाऱ्या गोविंद गावडे यांना बुधवारी (१८ जून) मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले.

Pramod Yadav

पणजी: गोविंद गावडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्याचे राजकीय वर्तुळात चांगलेच पडसाद उमटले. सावंत यांच्या काही मंत्र्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. 'मी जो मंत्री आहे तो मुख्यमंत्र्यांच्या इच्छेने', असे बाबूश यांनी विधान करून डॉ. सावंत यांचे वजन व अधिकार अधोरेखित केला. आरजीचे मनोज परब यांनी गावडे यांच्यावरील कारवाईचे स्वागत केले आहे.

'गोविंद गावडे यांना राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचा निर्णय माझाच होता', असे मुख्यमंत्री सावंत यांनी आज ठामपणे सांगितले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सावंत उत्तरले. आणखी कोणा मंत्र्यास हटवण्यासंदर्भात काही ठरलेले नाही, असेही त्यांनी सांगितले. कला आणि संस्कृती आणि क्रीडा खाते सांभाळणाऱ्या गावडे यांना बुधवारी मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले.

याशिवाय गावडे यांच्या जागी नवीन मंत्री म्हणून कोणाला घ्यावयाचे हे निश्चित झालेले नाही. मंत्रिमंडळ फेरबदल होणार असल्याचे वारंवार सांगितले गेले, त्यास मुख्यमंत्र्यांनीही यापूर्वी दुजोरा दिला.

मात्र, निश्चित वेळ आणि तारीख काही त्यांनी सांगितली नव्हती. परंतु गावडे यांना हटवल्यानंतर आणखी काही मंत्र्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आल्याचे दिसू लागले आहे. गावडे गेले, आता कोणाचा नंबर अशी विचारणा सध्या राजकीय वर्तुळातून होऊ लागली आहे.

दीपक ढवळीकर मगोपचे नेते दीपक ढवळीकर यांनी गोविंद गावडे यांना राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकण्यावर भाष्य करण्यास नकार दिला. ही भाजपची अंतर्गत बाब आहे आणि मी त्यावर भाष्य करू इच्छित नाही, असे ते म्हणाले.

गावडे यांच्यावर आधीच कारवाई करायला हवी होती. जेव्हा सामान्य माणसांना त्यांची गरज होती तेव्हा ते सत्तेत मश्गूल होते. भोमातील लोकांना त्यांनी कधीच दिलासा दिला नाही. गावडे हे नेहमी आपल्या गुर्मीत वावरले
मनोज परब, आरजीचे प्रमुख
मला काही बोलायचे नाही. मुख्यमंत्री आहेत, पक्षाध्यक्ष आहेत, ते निर्णय घेतील.
आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये

ढवळीकरांना तत्काळ हटविले होते

पार्सेकर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्याबद्दल भाष्य करण्यास नकार दिला. ते म्हणाले की, दिवस आणि वर्षे उलटत असताना राजकारणाचे गणित बदलत राहते. मात्र, कारवाईस विलंब लागला का, असे विचारले असता, आपल्या कारकिर्दीत ढवळीकरांना एका दिवसात हटविले असल्याच्या आठवणीला त्यांनी उजाळा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात 10 लाखांच्या दागिन्यांची चोरी, महाराष्ट्रात अनेक घरफोड्या; CCTV मुळे अट्टल चोरटा अटकेत

Goa Fisheries Policy: 6 महिन्‍यांत आखणार राज्य मत्स्योद्योग धोरण! मच्छीमार गावे अधिसूचित होणार; सरकारी पातळीवर हालचाली सुरू

RO RO Ferry: ..आता मुंबईतून सिंधुदुर्गात पोचणार झटक्यात! रो - रो सेवेची चाचणी; बोटीचे विजयदुर्ग बंदरात आगमन

Goa Water Supply: 'प्रत्येकाला सरासरी 12 तास पाणीपुरवठा करू', मंत्री फळदेसाईंचा दावा; गळती कमी करण्यासाठी ठोस पावले उचलणार

New GST Rates: गोव्‍यातील कॅसिनो उद्योगासाठी धक्‍का! जीएसटी 40 टक्‍के; पर्यटन, इतर व्यवसायांना फटका बसण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT