Chief Minister Dr. Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa: मुख्यमंत्र्यांनी डिचोली पोलिस स्थानकातील गणरायाचे घेतले दर्शन

मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister Dr. Sawant) गणपतीचे आशीर्वाद घेतानाच पोलिस स्थानकातील अधिकारी आणि पोलिसांना शुभेच्छा दिल्या.

दैनिक गोमन्तक

डिचोली: राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज डिचोली पोलिस (Dicholim Police Station) स्थानकातील अकरा दिवशीय अकरा गणपतीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री डॉ. सावंत (Chief Minister Dr. Sawant) यांचे पोलिस स्थानकात आगमन होताच पोलिसांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी गणपतीचे आशीर्वाद घेतानाच पोलिस स्थानकातील अधिकारी आणि पोलिसांना शुभेच्छा दिल्या.

डिचोली पोलिस स्थानकातील गणपती अकरा दिवस ठेवण्यात आला असून, पोलिसांतर्फे मार्गदर्शक तत्वांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. गणपतीसमोर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. त्यानिमित्त फुगड्या भजनादी कार्यक्रमात पोलिस उत्साहात भाग घेत आहेत. येत्या सोमवारी सायंकाळी उत्तरपूजा, आरती आदी कार्यक्रम झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त आज (शुक्रवारी) पोलिसांतर्फे श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त आरती आणि महाप्रसाद झाला. महिला पोलिसांतर्फे गणपतीसमोर फुगडी, झेंबाडे घालण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT