Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant Birthday: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर वाढदिवासानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव

Goa CM Pramod Sawant Birthday: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pramod Yadav

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (२४ एप्रिल) ५१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्री सावंत यांना वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

"गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला उत्तम आरोग्य, दिर्घ आणि यशस्वी आयुष्य लाभो ही प्रभू रामाकडे प्रार्थना आहे. तुमच्या नेतृत्वात गोवा विकासाचे नवे किर्तीमान स्थापन करत राहो", अशा शुभेच्छा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत.

महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि विद्यमान आमदार जयंत पाटील यांनी देखील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ह्याच सदिच्छा!", असा शुभेच्छा जयंत पाटील यांनी दिल्या आहेत.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी देखील प्रमोद सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय मंत्री विश्वजीत राणे, मंत्री माविन गुदिन्हो, खासदार श्रीपाद नाईक यासह राज्यातील आणि देशातील राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्री सावंत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी साखळी येथील दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्या देखील हजर होती.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सावंत यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. शुभेच्छा देण्यासाठी कोणीही येऊ नये असेही त्यांनी स्पष्ट केले. वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित सेवाकार्य वगळता सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Casino: आठ कॅसिनोंनी थकवला 315.56 कोटी महसूल; एक प्रकरण कोर्टात; एकाचा परवाना निलंबित

Goa Helmet Rule: हेल्मेट झालं सक्तीचं! दुचाकीवरील एकालाच नाही, तर दोघांनाही; परिपत्रक जारी

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलला रेड सिग्नल, परवाना रद्द : काम थांबवण्याचा कोर्टाचा आदेश

Morjim Farmers Issue: मोरजीमध्ये वन्य प्राण्यांचा उच्छाद! भाजीपाला बागा उद्ध्वस्त; हतबल शेतकऱ्यांची सरकारकडे भरपाईची मागणी

Dharbandora: सफर गोव्याची! थंडीत रंगणारा धालोत्सव, मांडावर येणाऱ्या ‘रंभा; धारबांदोड्याच्या आठवणी

SCROLL FOR NEXT