Goa Fishermen: गोमंतकीय मच्छीमारांना दिलासा, शुल्कात सवलत देण्यास CM सावंतांची सहमती

Fishing Community Goa: 'एसजीपीडीए'चे अध्यक्ष दाजी साळकर यांची भेट घेऊन हे शुल्क कमी करण्याची विनंती केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीय मच्छीमारांना सवलत देण्यास त्यांनी सहमती दर्शवली आहे,
Goa Fishermen
Goa FishermenDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी : ‘एसजीपीडीए’च्या सोमवारी (ता.२१) झालेल्या बैठकीत गोमंतकीय पारंपरिक मच्छीमारांसाठी सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्याकडून तास पद्धतीने शुल्क न घेता एकदाच शुल्क भरण्यासंदर्भात ‘एसजीपीडीए’ विचार करीत असल्याचे ‘एसजीपीडीए’चे अध्यक्ष आमदार दाजी साळकर यांनी पत्रकारांना सांगितले.

मडगाव येथील ‘एसजीपीडीए’च्या घाऊक मासळी मार्केटमध्ये सध्या गोमंतकीय मच्छीमारांसाठी तास पद्धतीने शुल्क आकारले जाते. काही दिवसांपूर्वी गोमंतकीय पारंपरिक मच्छीमार, बोट मालक यांनी ‘एसजीपीडीए’चे अध्यक्ष दाजी साळकर यांची भेट घेऊन हे शुल्क कमी करण्याची विनंती केली होती.

यासंदर्भात आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली असून गोमंतकीय मच्छीमारांना सवलत देण्यास त्यांनी सहमती दर्शवली आहे, असे साळकर यांनी सांगितले.

Goa Fishermen
Bhandari Samaj Goa: ...तसे न केल्यास देवानंद नाईकांवर अब्रू नुकसानीचा दावा करणार, गावकर यांचा इशारा

या मासळी विक्रेत्यांना जर एकदाच शुल्क भरण्याची पद्धत अवलंबली तर किती नुकसान होईल, याचा अभ्यास करण्यास ‘एसजीपीडीए’च्या सदस्य सचिवांना सांगितले आहे. पुढील १५ दिवसांत जेव्हा परत बैठक होईल, त्यावेळी यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे साळकर यांनी सांगितले.

दरम्यान, एसजीपीडीएच्या घाऊक मासळी मार्केटमध्ये गोमंतकीय मासळी विक्रेत्यांना व इतर राज्यातील मासळी विक्रेत्यांना वेगवेगळ्या जागा देण्यासंदर्भात साळकर यांनी सांगितले की, इमारतीचा दुसरा टप्पा पूर्ण होत नाही तोपर्यंत गोमंतकीय व इतर राज्यातील मासळी विक्रेत्यांना वेगवेगळ्या जागा देणे शक्य होणार नाही. तोपर्यंत काही तरी पर्याय शोधला जाईल, असेही साळकर यांनी सांगितले.

साळकर यांनी सांगितले की, घाऊक मासळी मार्केटची इमारत बांधताना ज्या सुविधा उपलब्ध करण्याचे ठरले होते त्या सुविधा पूर्ण केल्या जातील. त्यात कोल्ड स्टोरेज सुविधाचा समावेश असल्याचे साळकर यांनी स्पष्ट केले.

Goa Fishermen
Goa Weather: राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू, वातावरणातील बदलामुळे गोमंतकीय हैराण

सोपो गोळा निविदा प्रलंबित

गोमंतकीय मच्छीमारांसाठी एकदाच शुल्क भरण्याची पद्धत सुरू करायची असल्याने सोपो गोळा करण्यासाठी जी निविदा जाहीर करण्यात येणार होती, ती तात्पुरती प्रलंबित ठेवण्यात आल्याचे साळकर यांनी स्पष्ट केले. सध्या जी निविदा तयार केली आहे, ती सध्याचे शुल्क दराप्रमाणे आहेत. त्यामुळे ही निविदा जाहीर करून काहीच साध्य होणार नाही, असेही साळकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com