Goa CM Dr. Pramod Sawant Meet PM Narendra Modi Pramod Sawant X Handle
गोवा

Goa CM Meet PM Modi: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; दिल्लीत भेटीगाठी सुरुच

Goa CM Dr. Pramod Sawant Meet PM Narendra Modi: राज्याच्या प्रगती आणि विकासासाठी त्यांचे बहुमोल मार्गदर्शन घेतले, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी एक्सवरुन दिली आहे.

Pramod Yadav

Goa CM Dr. Pramod Sawant Meet PM Narendra Modi

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (२३ जानेवारी) नवी दिल्लीत भेट घेतली. मुख्यमंत्री सावंत कालपासून (२२ जानेवारी) दिल्लीत आहेत. बुधवारी त्यांनी अमित शहा, जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्यानंतर आज त्यांनी मोदींची भेट घेतली.

सावंत मोदींची दिल्लीत भेट

मुख्यमंत्री सावंत यांनी दिल्लीत मोदींची भेट घेतली. "गोव्यात सुरु असलेल्या विविध विकासकामांची माहिती मोदींना दिली तसेच, त्यांच्या सहकार्याबाबत त्यांचे आभार मानले. राज्याच्या प्रगती आणि विकासासाठी त्यांचे बहुमोल मार्गदर्शन घेतले", अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी एक्सवरुन दिली आहे.

जे. पी. नड्डांची भेट

यापूर्वी सावंत यांनी राज्याचे नवे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी नाईक प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर नड्डांसोबत ही पहिलीच भेट होती.

गृहमंत्री अमित शहांची भेट

मुख्यमंत्री सावंत यांनी गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेऊन त्यांच्याकडून विविध मुद्यांवर मार्गदर्शन घेतले. दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी राजकीय नसल्याचे स्पष्ट झाले असले तरी दोन दिवसांतील या घडामोडींमुळे मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

अर्थमंत्री निर्मला सितारामण यांची भेट

दिल्लीत सावंत यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचीही भेट घेऊन, सावंत यांनी गोव्यासाठी सोळाव्या वित्त आयोगानुसार कराचा वाटा, यासह राज्याच्या प्रगतीसाठी महत्वाचे प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.

पर्यावरण मंत्री भुपेंद्र् यादव यांची भेट

सावंत यांनी पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांची भेट घेऊन पश्चिम घाटातील जैव संवेदनशील क्षेत्रातील १०८ गावांमधील २१ गावे वगळण्याची मागणी त्यांच्याकडे केली. मंत्री यादव याबाबत सकारात्मक असल्याची माहिती सावंत यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT