Shweta Kapila: गोमंतकीय शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 'श्वेत कपिला' गायीला मिळाली राष्ट्रीय मान्यता

Shweta Kapila National Recognition: गोव्यातील 'श्वेत कपिला' या गायींच्या जातीला आयसीएआर-नॅशनल ब्युरो ऑफ अ‍ॅनिमल जेनेटिक रिसोर्सेसकडून (एनबीएजीआर) अधिकृतपणे राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.
Shwet Kapila cattle breed
Shweta KapilaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील 'श्वेत कपिला' या गायींच्या जातीला आयसीएआर-नॅशनल ब्युरो ऑफ अ‍ॅनिमल जेनेटिक रिसोर्सेसकडून (NBGR) अधिकृतपणे राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.

आयसीएआर जात नोंदणी समितीनं 'श्वेत कपिला' या जातीची नोंदणी क्रमांक INDIA CATTLE_3500_SHWETAKAPILA_03048 अंतर्गत केली होती. राष्ट्रीय मान्यता मिळवणारी ही गोव्यातील पहिलीच गायीची जात ठरली आहे.

श्वेत कपिला या जातीच्या गाई गोव्याच्या आव्हानात्मक हवामानाशी म्हणजेच येथील जास्त पाऊस आणि उष्ण, दमट परिस्थितीचा सामना करण्यासाठी ओळखली जाते. अधिकृत मान्यता नसल्यामुळं या जातीला पूर्वी "नॉन-डिस्क्रिप्ट" म्हणून वर्गीकृत करण्यात आलं होतं.

Shwet Kapila cattle breed
Goa Cabinet: मुख्यमंत्री सावंतांनी घेतली अमित शहांची भेट, गोव्यात राजकीय चर्चांना उधाण; मंत्रिमंडळ फेरबदलाला पुन्हा चालना?

दरम्यान, आयसीएआर जात नोंदणी गोवा समितीच्या अथक प्रयत्नानंतर 'श्वेत कपिला' या गाईंच्या जातीला अधिकृतपणे राष्ट्रीय मान्यता मिळालीय. भारताच्या समृद्ध कृषी जैवविविधतेचा भाग म्हणून 'श्वेत कपिला' या गाईंच्या जातीला आता वेगळी ओळख मिळाली आहे.

प्रमाणपत्र समारंभ नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान संकुलात आयोजित करण्यात आला होता. आयसीएआर-केव्हीके, आयसीएआर-सीसीएआरआय, गोवा येथील प्राणी विज्ञानातील वरिष्ठ शास्त्रज्ञ उधरवार संजयकुमार यावेळी उपस्थित होते. यावेळी 'श्वेत कपिला' या गायींच्या राष्ट्रीय मान्यता नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आलं.

Shwet Kapila cattle breed
Goa Eco Sensitive Zone: 22 जैवसंवेदनशील गावे वगळण्याचा प्रस्ताव पुन्‍हा केंद्राकडे सादर; मुख्‍यमंत्र्यांनी घेतली पर्यावरणमंत्री यादव यांची भेट

'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना उधरवार संजयकुमार म्हणाले की, "श्वेत कपिला या गायीच्या जातीला मान्यता मिळाल्यान नैसर्गिक शेतीला चालना मिळेल. राज्यातील लहान शेतकरी कमी खर्चात या गाईंची देखभाल सहजपणे करू शकतात.

श्वेत कपिला जातीच्या गाईंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा आकर्षक पांढरा रंग. तोंडापासून चे शेपटीच्या टोकापर्यंत पांढरा रंग असतो. ज्यामध्ये त्यांच्या पांढऱ्या पापण्या आणि तोंडाचाही समावेश असतो. या जातीच्या गाई लहान ते मध्यम उंचीच्या असतात.

दुग्धोत्पादनाच्या बाबतीत, श्वेत कपिला ही जात मध्यम उत्पादनासाठी ओळखली जाते. दररोज दूध उत्पादन १.८ ते ३.४ किलो असते आणि स्तनपान करवण्याचे प्रमाण २५० ते ६५० किलो असते. या जातीची उंची ९७ ते १३७ सेमी पर्यंत असते आणि सध्या या जातीच्या गाईंची संख्या २२,००० च्या आसपास असल्याचा अंदाज आहे.

दुग्धोत्पादनाच्या बाबतीत, श्वेत कपिला ही जात मध्यम उत्पादनासाठी ओळखली जाते. दररोज दूध उत्पादन १.८ ते ३.४ किलो असते आणि स्तनपान करवण्याचे प्रमाण २५० ते ६५० किलो असते. या जातीची उंची ९७ ते १३७ सेमी पर्यंत असते आणि सध्या या जातीच्या गाईंची संख्या २२,००० च्या आसपास असल्याचा अंदाज आहे.

Shwet Kapila cattle breed
FC Goa च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आघाडीपटू सादिकू निलंबनमुक्त; पुढच्या सामन्यासाठी उपलब्ध

केंद्र सरकारच्या प्रमुख "मिशन झिरो नॉन-डिस्क्रिप्ट" या उपक्रमाचे उद्दिष्ट भारतातील मूळ प्राण्यांच्या अनुवांशिक संसाधनांचे संरक्षण आणि प्रोत्साहन देणं आहे. राष्ट्रीय प्राणी अनुवांशिक संसाधन डेटाबेसमध्ये या जातीचा समावेश केल्यामुळं या जातींच्या गाईला एक विशेष ओळख मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com