CM pramod sawant Dainik Gomantak
गोवा

Goa EV Subsidy: दुचाकीसाठी 25 हजार, चारचाकीला 1 लाख रूपये; इलेक्ट्रिक वाहनखरेदीसाठी पुन्हा मिळणार अनुदान?

प्रत्येक तालुक्यात दोन ईव्ही चार्जिंग स्टेशन्स सुरू करणार

Akshay Nirmale

Goa EV Subsidy: आम्हाला 15 ऑगस्ट 2024 पर्यंत पणजी शहराला सौर शहर बनवायचे आहे, त्यामुळे राज्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EVs) सबसिडी पुन्हा सुरू करणार आहोत.

चारचाकी वाहनांसाठी 1 लाख, दुचाकी वाहनांसाठी 50,000 आणि रिक्षांसाठी 25,000 रूपये अनुदान असेल, असे सूतोवाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. गोवा माईल्सच्या अॅप अनावरण प्रसंगी गुरूवारी त्यांनी याबाबत माहिती दिली.

गोव्याला सौरउर्जेवर चालणारे राज्य बनविण्याचे प्रयत्न असून 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. आधी सरकारकडून हे अनुदान दिले जात होते. पण मध्यंतरी ते बंद झाले होते. आता ते पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्याच्या वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडवून आणताना पर्यावरणीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण आखल्याचेही त्यांनी सांगितले. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी सार्वजनिक वाहनांना इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बदलण्यात येईल.

कार्बन उत्सर्जन 2050 पर्यंत शून्यावर आणण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे, परंतु गोव्याला ते 2030 पर्यंत पूर्ण करायचे आहे.

राज्यातील 13 हजार रिक्षा आणि 10 हजार मोटारसायकल पायलट यांच्यावर आर्थिक बोजा न पडू देता, त्यांना इलेक्ट्रिक वाहनांनी बदलायचे आहे, त्यामुळे मालकांनी घाबरू नये. सर्वांना विश्वासात घेतले जाईल.

प्रत्येक तालुक्यात दोन ईव्ही चार्जिंग स्टेशन्स स्थापन करण्याची योजना सुरू आहे. यासाठी पेट्रोल पंप मालकांशी आधीच चर्चा झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT