CJP Protest Panaji Dainik Gomantak
गोवा

CJP Protest Panaji: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी पणजीत रणकंदन; आझाद मैदानावर आंदोलक आणि पोलिसांत जोरदार धुमश्‍चक्री!

Gyanesh Kumar Resignation: निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पणजीतील आझाद मैदानावर आंदोलकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पणजीतील आझाद मैदानावर आंदोलकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला. यावेळी मैदानाकडे जाण्यास पोलिसांनी आंदोलकांना मज्जाव केला. यावेळी मोठी धुमश्‍चक्री झाली.

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचे दिल्लीत जंतरमंतर येथे आंदोलन जाहीर झाल्यानंतर गोव्यातही सीजेपीने रविवारी पणजीत आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. त्यास ‘इनफ इज इनफ'' संघटनेनेही पाठिंबा जाहीर केला होता. तत्पूर्वी आझाद मैदानात आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही सीजेपीच्या आंदोलनकर्त्यांनी सायंकाळी ४ च्या सुमारास मैदानावर जमून आंदोलनाचा प्रयत्न केला. काही आंदोलनकर्त्यांनी हातात पक्षाचे झेंडे, तिरंगा व ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी न्या. रिबेलो यांच्यासह क्लॉड अल्वारिस, गोविंद शिरोडकर, स्वप्नेश शेर्लेकर, आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, देविदास आमोणकर आणि इतर उपस्थित होते.

अर्धा तास रंगले वाक््युद्ध

आंदोलनस्थळी पोहोचलेले न्या. रिबेलो यांनी आझाद मैदानात जाण्यासाठी संयुक्त मामलेदार तसेच पोलिसांकडे परवानगी मागितली. परंतु पोलिसांनी त्यांची मागणी फेटाळली. याप्रसंगी न्या. रिबेलो आणि ॲड. नॉर्मा अल्वारिस यांनी संयुक्त मामलेदार दत्तप्रसाद तोरस्कर यांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या, परंतु अधिकाऱ्यांनी मैदानावर आंदोलनास बंदी घातलेल्या सूचनेचा वारंवार उल्लेख केला. त्यावेळी न्या. रिबेलो यांनी विविध कायदे-नियमांवर बोट ठेवले. तरीही त्याकडे अधिकारी व पोलिसांनी दुर्लक्ष केले. जवळपास अर्धा तास अधिकारी व आंदोलनकर्त्यांत वाकयुद्ध सुरू होते.

अखेर गार्सिया उद्यानात सभा!

आझाद मैदानात आंदोलनास परवानगी नाकारल्याने अखेर न्या. रिबेलो व इतरांनी पणजी महापालिकेच्या गार्सिया उद्यानात सभा घेण्याचे जाहीर केले. महात्मा गांधी रस्त्यावरील प्रवेशद्वारासमोरून आंदोलनकर्ते गार्सिया उद्यानात आले आणि त्याठिकाणी न्या. रिबेलो यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यात ‘इनफ इज इनफ'' संघटनेने सरकारकडे दिलेल्या दहा मागण्यांचा उल्लेख केला. आझाद मैदानावर प्रवेश नाकारल्याने सरकारवर त्यांनी टीका केली.

सुखेजा, अमरिनला पोलिसांनी घेतले ताब्यात

आंदोलनकर्ते आझाद मैदानात प्रवेश करण्याच्या पवित्र्यात असल्यामुळे पोलिसांनी सीजेपीच्या प्रतिनिधी अमरीन शेख यांच्यासह आंदोलनास पाठिंबा देणारे पणजीचे नगरसेवक जॅक सुखेजा, मिलिंद राणे तसेच इतर चारजणांना ताब्यात घेतले.

आझाद मैदानाला पोलिसांचा गराडा : छावणीचे स्वरूप

आझाद मैदानावर आंदोनलकर्त्यांकडून कोणत्याही बाजूने प्रवेश होऊ नये, यासाठी मैदानाच्या चारही बाजूंनी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता. पोलिस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर, निरीक्षक विजयकुमार चोडणकर, उपनिरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. पोलिस व्हॅनही सज्ज ठेवल्या होत्या. आंदोलन चिघळलेच तर संरक्षण साहित्यही पोलिसांनी आणून ठेवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT Exam Cheating: ‘मुन्नाभाई’ स्टाईल जुगाड पडला महागात! फर्मागुढीच्या आयआयटी परीक्षेत ब्लूटूथचा वापर करुन कॉपी करणारे दोघे विमानतळावर जाळ्यात

Surla Mining Dump Issue: तोडगा निघाल्याशिवाय सुर्लमध्ये खाण सुरु होणारच नाही! ग्रामस्थांच्या तीव्र विरोधानंतर CM सावंतांचे यांचे मोठे वक्तव्य

Horoscope: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कृपा! सिंह, धनुसह 'या' 4 राशींना होणार लाभ; वाचा 12 राशींचे राशिभविष्य

Sangameshwar Chalukya Dynasty: संगमेश्वरच्या चालुक्य राजघराण्याचा पराक्रमी इतिहास! पोर्तुगीज आणि आदिलशाहीला दिले होते कडवे आव्हान

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

SCROLL FOR NEXT