CJP Protest Panaji: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी! 'सीजेपी'चे 11 ऑक्टोबरला पणजीत आंदोलन, अभिजीत दीपके राहणार अनुपस्‍थित

Gyanesh Kumar Resignation Demand: अधिकाधिक गोमंतकीयांनी या आंदोलनात मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे’’, असे आवाहन सीजेपीच्‍या पदाधिकारी अमरीन शेख यांनी केली.
Gyanesh Kumar Resignation Demand
CJP Protest PanajiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: ‘‘केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्‍य आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा, विशेष सखोल उजळणी अहवाल (एसआयआर) रद्द करणे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्‍या पॅनलमध्‍ये पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्‍यायाधीशांचा समावेश करण्‍याच्‍या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीच्‍या (सीजेपी) गोवा विभागातर्फे येत्‍या ११ ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता पणजीतील आझाद मैदानावर आंदोलन छेडण्‍यात येणार आहे.

अधिकाधिक गोमंतकीयांनी या आंदोलनात मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे’’, असे आवाहन सीजेपीच्‍या पदाधिकारी अमरीन शेख यांनी केली. पक्षाचे इतर पदाधिकारीही यावेळी उपस्‍थित होते. आपला देश लोकशाही पद्धतीने चालत नाही. नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. निवडणुका पारदर्शक पद्धतीने होत नाहीत, हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्‍या कृतीतून समोर आलेले आहे. त्‍यामुळेच सीजेपीने केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्‍य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्‍या राजीनाम्‍यासाठी देशभर आंदोलन सुरू केले आहे.

Gyanesh Kumar Resignation Demand
Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

गोव्‍यातही अभिजीत दीपके यांच्‍या नेतृत्‍वाखाली ११ ऑक्‍टोबरला आंदोलन छेडण्‍यात येणार होते. परंतु, काही कारणांमुळे दीपके या आंदोलनात सहभागी होणार नाहीत. सीजेपीच्‍या गोवा विभागाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील. आंदोलनादरम्‍यान आझाद मैदानाच्‍या चारही कोपऱ्यांत बॉक्‍स ठेवण्‍यात येतील. नागरिकांनी येताना आपले प्रश्‍‍न, समस्‍या लिहून घेऊन त्‍या संबंधित बॉक्‍समध्‍ये टाकाव्‍या, असेही त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com