CJP Protest 2026: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

NEET Paper Leak Protest: मंत्रिपदाचा राजीनामा देऊन संसदेत प्रवेश केल्यानंतर धमेंद्र प्रधान यांचे जोरदार स्वागत करून भाजपचे खासदार म्हणाले ‘तुम्ही काहीही चुकीचे केलेले नाही.
NEET Paper Leak Protest
CJP Protest 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

शंभू भाऊ बांदेकर

मंत्रिपदाचा राजीनामा देऊन संसदेत प्रवेश केल्यानंतर धमेंद्र प्रधान यांचे जोरदार स्वागत करून भाजपचे खासदार म्हणाले ‘तुम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत’ याला याच्या उलट आमरण उपोषणास बसलेले सोनम वांगचूक यांचे भाष्य असे होते की, या विद्यार्थी आंदोलनास प्राप्त यशामुळे महात्मा गांधी यांचे विचार आजही समर्पक असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

ही ‘झुरळे’ आमचे काय करणार? अशी ताठर व कठोर भूमिका घेतल्यामुळे व तितक्या निर्धारित ‘सीजेपी’ च्या झुरळांसह इतर सर्वपक्षीय तरुणांनी उपोषणाची, शांततामय संघर्षाची भूमिका घेतल्यामुळेच त्यांच्या तीनही मागण्या सरकारला मान्य कराव्या लागल्या. शेवटी प्रधानमंत्र्यापुढे व विशेषतः युवाशक्तीपुढे मान हलवून ज्या प्रधानांनी आपला राजीनामा दिला त्यांची प्रतिक्रिया म्हणजे ‘पड गए फिर भी टॉंग उपर’ अशीच म्हणावी लागेल.

NEET Paper Leak Protest
Orwellian Democracy: 'ऑर्वेलियन लोकशाही' ते आजचा डिजिटल सर्व्हेलन्स

त्यांचे म्हणणे असे, की कोणत्याही भारतीय विद्यार्थ्यांचे भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकणार नाही. याची काळजी घेणे आणि आपल्या मुलांना अभ्यासासाठी व करिअर घडवण्यावर लक्ष केंद्रित केल्यास वाव देणे या उद्देशांनी आपण पंतप्रधानांकडे राजीनामा सादर केला. अर्थात, याला उशिरा सुचलेले शहाणपण असेच म्हणावे लागेल. यावर कहर म्हणजे शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन संसदेत प्रवेश केल्यानंतर धमेंद्र प्रधान यांचे जोरदार स्वागत करून भाजपचे खासदार म्हणाले ‘तुम्ही काहीही चुकीचे केलेले नाही.

आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत’ याला ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असे म्हटले तर ते चुकीचे म्हणता येईल काय? याच्या उलट पर्यावरणवादी कार्यकर्ते व आमरण उपोषणास बसलेले सोनम वांगचूक यांचे भाष्य असे होते की, या विद्यार्थी आंदोलनास मिळालेल्या यशामुळे महात्मा गांधी यांचे विचार आजही समर्पक असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. या दोन्ही प्रकारच्या विचारांमुळे वाचकांना ‘हा सूर्य, हा जयद्रथ’ हे सिध्द झाले आहे, असे म्हणता येईल.

NEET Paper Leak Protest
Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

पंतप्रधानांनी परीक्षा सुधारणांसाठी इन्फोसिस चे सहसंस्थापक नंदन नीलकेणी यांच्यानेतृत्वाखाली एका उच्चाधिकार कृती दलाची म्हणजे ‘टास्क फोस’ ची स्थापना केली ही चांगलीच गोष्ट झाली, असे म्हणावे लागेल. शिवाय या कृतीदलामध्ये ‘इस्त्रो’ चे माजी प्रमुख एस. सोमनाथ, गुप्तचर विभाग माजी संचालक तपन डेका, आयआयटी मद्रासच्या व्ही. कामकोटींपासून मातब्बर व अनुभवी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती ‘नीट’चा पूर्वेतिहास जाणून घेऊन भविष्यकाळात सगळ काही परीक्षांच्या बाबतीत नीटनेटकं होईल, त्यात कसलीच त्रूटी राहणार नाही, याची नक्कीच दखल घेतील, यात शंका बाळगण्याचे कारण नाही.

मुख्य म्हणजे आंदोलकांच्या ज्या तिन्ही रास्त मागण्या होत्या, त्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि नवीन कृती दलाची स्थापना करून आंदोलनाच्या पहिल्याच आठवड्यात हा विषय निकालात काढला असता तर विरोधकांना संसदेपासून आणि तरुणाईला भारतभर आंदोलन उभारून प्रश्‍नच निकालात काढता आला असता त्यामुळे ‘बुंदसे गई, वह हौदसे नही आती’ असेच लोक म्हणताहेत व तेही चुकीचेच आहे, असे समजणे हेच चुकीचे होईल. निदान यापुढे तरी केंद्र काय किंवा राज्य सरकार काय त्यांना तरुणाईला झुरळे समजून सहज फेकून देता येणार नाही, हा बोध सर्वांच्याच हिताचा ठरणार आहे.

NEET Paper Leak Protest
Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

या आंदोलनातून देशभरातील तरुणाईमध्ये एक नवा जोश निर्माण झाला आहे. त्याचा उपयोग ‘होश’ मध्ये राहून संयम, विवेक आणि अहिंसा यांचे पालन करून केले, तर पुढच्या देशाच्या समाजकारणाला आणि राजकारणाला योग्य दिशा प्राप्त होऊ शकली. सध्या देशातील १८ ते २९ या वयोगटातील तरुण मतदारांचे प्रमाण २९ टक्के आहे. स्व. राजीव गांधी यांनी तरुणांना मतदान हक्क देऊन त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचे काम केले आहे. अर्थात बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा मोठ्या राज्यांमध्ये हे प्रमाण ३० ते ३५ टक्के पर्यंत जाऊ शकते.

ही तरुणाईची वाढती मतदानशक्ती योग्यवेळी योग्य त्या दिशेने पाऊल टाकील.आणि आपण या देशाचे भावी आधारस्तंभ आहोत, हे सिध्द करील याची त्यांनी अत्यंत कर्तव्यबुध्दीने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा देताना धमेंद्र प्रधान म्हणाले की, विद्यार्थ्यांचे आंदोलन राष्ट्रद्रोही शक्तींच्या हाती जाऊ नये म्हणून आपण राजीनामा देत आहोत, त्यांचे हे म्हणणे सत्यास धरून होते, असे त्यांच्या पक्षातील लोक तरी खरे मानतील काय?’

NEET Paper Leak Protest
Indian Student Movement: 'नीट' पेपरफुटीमुळे विज्ञान क्षेत्राला कळले विद्यार्थी चळवळीचे राजकीय महत्त्व!

खरं तर, सीजेपी लोक काय किंवा इतर अपक्ष किंवा इतर पक्षांचे लोक काय, या सर्वांना त्यांच्या पक्षांचा नैतिक पाठिंबा होता. त्यामुळेच जंतर-मंतरवर फक्त दिल्लीतीलच नव्हे, तर स्वखर्चाने या आंदोलनाला वाव देऊन देशभरातील युवकांसह युवती एकत्र आल्या होत्या. याचा निःपक्षपातीने विचार करून आपण असे म्हणू शकतो की, ‘पेपरफुटी’त युवाशक्तीचा जय झाला, तर केंद्राचा पराजय झाला हे वास्‍तव नाही काय?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com