Goa News | Turdal  Dainik Gomantak
गोवा

Goa News: तूरडाळ नासाडीप्रकरणी आठ अधिकाऱ्यांची होणार चौकशी!

Goa News: तूरडाळ व साखरेच्या नासाडीप्रकरणी दक्षता खात्यामार्फत चौकशी सुरू झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: नागरी पुरवठा खात्याच्या (Civil Supplies Department) हलगर्जीपणामुळे तूरडाळ व साखरेच्या नासाडीप्रकरणी दक्षता खात्यामार्फत चौकशी सुरू झाली आहे. तूरडाळीच्या प्रकरणाला जबाबदार असलेल्या खात्याच्या तत्कालिन संचालकांसह आठजणांविरुद्ध चौकशीसाठी जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे.

दरम्यान, यामध्ये सर्वजण राजपत्रित अधिकारी असून ताब्यात असलेल्या फाईल्समधून प्रत्येकाची या प्रकरणातील भूमिका तपासणीचे काम सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. या तुरडाळीच्या चौकशीनंतर राज्य सरकारने साखरेचीही चौकशी दक्षता खात्याला करण्याचे निर्देश दिल्याने त्याचीही चौकशी सुरू झाली आहे.

तसेच, या दोन्ही प्रकरणांची वेगवेगळी चौकशी करण्यात येत असली तरी फाईल्स हाताळणारे नागरी पुरवठा खात्यातील अधिकारी तेच असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात येत आहे.

यांची नावे निश्‍चित!

नागरी पुरवठा खात्यातील संचालक सिद्धीविनायक नाईक, फ्रँकलिन फेर्रांव, विरा नायक, विल्सन फुर्तादो, दिलीप गावडे, सिव्हिया क्रास्टो, राजीव सावंत व स्नेहा गावकर या राजपत्रित अधिकाऱ्यांची भूमिका तपासून पाहण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

SCROLL FOR NEXT