Goa Chorla Ghat News Dainik Gomantak
गोवा

Goa Chorla Ghat News: चोर्ला घाटात 'अवजड' वाहनांची पुन्हा गर्दी!

Goa Chorla Ghat News: जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला, पण कुठेही सीमेवर 'त्या' आदेशाची नोटीस लावलेली नाही.

दैनिक गोमन्तक

Goa Chorla Ghat News: चोर्ला घाटात सप्टेंबर महिन्यात अवजड वाहनांसाठी बंद घालण्याचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आणि दोन दिवसात बाहेरील वाहनचालकांनी घाटावरच गाड्या अडविणार, भाजी, दुधाची वाहतूकही बंद करणार असा इशारा देताच रात्री 10 ते सकाळी सहापर्यंत या वाहनांना सूट दिली.

दरम्यान, त्यामुळे चोर्लातून 24 तास प्रचंड प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा सुरूच आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी असून या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला, पण कुठेही सीमेवर ‘त्या’ आदेशाची नोटीस लावलेली नाही. त्यामुळे अवजड वाहने दिवसभर घाट रस्‍त्यावरून केरीपर्यंत येतात.

केरीत तपासणी नाक्यावर पोलिस (Police) सतर्क असून ते एकही वाहन पुढे सोडत नाही. त्यामुळे ही वाहने केरी तपासणी नाक्यावर थांबलेली असतात. या वाहनांना येथे जागा अपुरी पडते, शिवाय रस्त्यांच्या दोन्ही बाजूला ही वाहने थांबल्याने इतर केरी तपासणी नाका गाड्यांनी व्यापला जात आहे.

बेळगावहून गोव्यात येणारी वाहने परतवून लावणे शक्य नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कारण गोवा राज्याच्या घाट रस्त्‍यावर वाहने वळवण्यासाठी पुरेशी जागा नाही. मात्र, ही वाहने सुर्ला येथे कर्नाटक तपासणी नाक्यावर रोखणे शक्य असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

घाटात वाहनांची गर्दी

बेळगावहून येणाऱ्या अवजड वाहन चालकांना गोवा सीमेपर्यंत कुठेही अडवले जात नाही. त्यामुळे ही वाहने थेट घाट रस्त्‍यांने गोव्यात प्रवेश करतात. घाटात त्यांना बंदीबाबत सूचना केल्यानंतर ही वाहने घाटातच रात्री दहा वाजेपर्यंत थांबवली जातात.

अरुंद रस्ता असून काही ठिकाणी ही वाहने थांबलेली असतात, त्यामुळे घाटात अनेक वेळा वाहतूक कोंडी (Traffic Jam) होते. शिवाय इतर वाहनांना ये-जा करणे कठीण होते.

तीन वर्षांपूर्वीचा कालबाह्य सूचना फलक

  • गोवा सीमेवरच वाहनचालकांचा गैरसमज होत आहे. कारण 20 मार्च 2019 ते 30 सप्टेंबर 2019 पर्यंत अवजड वाहतूक बंदीचा सूचना फलक लावण्यात आलेला आहे. त्यानंतर अनेक वेळा वाहतुकीबाबत बदल झाले, पण हा फलक कायम राहिले.

  • सप्टेंबरमध्ये उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहनांना बंदीचा आदेश काढला, परंतु त्याबाबत कुठेही फलक लावला नाही. त्यामुळे अवजड वाहने थेट घाटातून केरीपर्यंत येत असून आपल्याला काहीच सूचना नाही, असे वाहन चालक सांगतात.

  • तीन वर्षांपूर्वीचा सूचना फलक आहे, दिमाखात झळकत असून गोवा शासनाचे अद्याप त्याकडे लक्ष नाही,याबाबत वाहनचालकांतर्फे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

वाहतूक पोलिसांची गरज: गोवा (Goa) सीमेवर किंवा सुर्ल परिसरात अवजड वाहनांना प्रवेश बंदीची सूचना देण्यासाठी फलकाची गरज आहे. शिवाय या ठिकाणी वाहतूक पोलिस ठेवणे गरजेचे आहे. कारण केरीत पाच-दहा पोलिस ठेवून या प्रकाराकडे लक्ष ठेवण्यापेक्षा सीमेवरच हा प्रकार रोखला पाहिजे, असे ग्रामस्थांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT