Goa Natural Disaster: कमी वेळात होणाऱ्या अतिवृष्टीच्या इंटेन्स स्पेल (Intense spell) घटना अलीकडच्या 15 ते 20 वर्षात वाढल्या असून त्याचा परिणाम जीवित हानीसह नैसर्गिक आपत्तीमध्ये रूपांतरित होत आहेत. याबाबत सतर्कतेच्या यंत्रणेबरोबर प्रशासकीय यंत्रणा सक्रिय होणे गरजेचे आहे असे मत मान्सून क्षेत्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एम. रमेशकुमार यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केले आहे.
समुद्रावरून वाहून येणारी आर्द्रता, भूखंडीय तापमानात झालेली वाढ. यामुळे वादळ सदृश स्थिती निर्माण होते. त्यामुळे समांतर पातळीवरचे ढग उभ्या अवस्थेत येतात आणि एका ठरावीक भागात अत्यंत कमी वेळेत अतिवृष्टी होते.
तसेच, हीच ती इंटेन्सस्पेल स्थिती होय. या अवस्थेत तासाभरात शेकडो मिलिमीटर पाणी अक्षरशः कोसळते. या घटनेमुळे शेजारील भागांमध्ये नद्या, नाले, ओढे यांना महापूर येतो आणि त्याचा परिणाम मानवी जीवितहानी बरोबर भोवतालच्या पर्यावरणावर दीर्घकालीन होतो, असे मत डॉ. रमेश कुमार यांनी व्यक्त केले आहे.
वाळपईत दोन तास धो धो
शुक्रवारी वाळपईमध्ये वादळसदृश अतिवृष्टी झाली. 40 मिनिटांत 70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर 2 तासांत 110.5 मिलिमीटर पाऊस पडला. यंदा मान्सूनोत्तर सर्वाधिक 196 मिलिमीटर पाऊसही येथेच झाला आहे, अशी माहिती वैज्ञानिक एम. राहुल यांनी दिली आहे.
ऑक्टोबरमधील सर्वाधिक पाऊस
15 ऑक्टोबर 2017 पेडणे 112, 9 ऑक्टोबर 2018 फोंडा 78, 26 ऑक्टोबर 2019 पेडणे 220, 11 ऑक्टोबर 2020 पेडणे 80, 7 ऑक्टोबर 2021 पणजी 177, 14 ऑक्टोबर 2022 वाळपई 196
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.