Ferry Boat  Dainik Gomantak
गोवा

Ferry Boat: चोडण-रायबंदर फेरीबोट सेवा विस्कळीत; नियमित प्रवाशांचे अतोनात हाल

प्रचंड धुक्यामुळे चोडण-रायबंदर फेरी धक्क्यावरील फेरीबोट बंद पडली, गैरसोयीमुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

दैनिक गोमन्तक

Ferry Boat: प्रचंड धुक्यामुळे चोडण-रायबंदर फेरी धक्क्यावरील फेरीबोट काल सोमवारी सकाळी चार तास आणि मंगळवारी सकाळी दोन तास बंद पडली. यामुळे चोडण-रायबंदर फेरी मार्गावरून येजा करणाऱ्या नियमित प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

काल काही प्रवाशांना आज पणजी गाठण्यासाठी पोंबुर्फा हा लांबचा मार्ग स्वीकारावा लागला. या प्रकारामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

एरवी चोडण धक्क्यावर थांबणाऱ्या या मार्गावरील पाचही फेरीबोटी रायबंदर धक्क्यावर नेण्याचे कारण लोकांना समजत नव्हते. काल सकाळी चार तास फेरीसेवा बंद राहिल्याने तसेच खात्याने या संदर्भात कोणती माहिती न दिल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

चोडण मार्गावर शिवनेरी व सह्याद्री या दोन चांगल्या फेरीबोटी आहेत. मात्र स्वच्छतागृहाची सोय नसल्याने या फेरीबोटीचे कर्मचारी रात्र उशिरा पणजीकडे नेत असून सकाळी उशिरा ते या मार्गावर फेरीबोटी पाठवत असतात.याचाही परिणाम दिसून आला.

सोमवार हा कामकाजाचा दिवस असल्याने सकाळपासून या मार्गावर प्रचंड वाहतूक होती. परंतु सर्वत्र थंडीसह धुके पसरल्याने या मार्गावरील पाचही फेरीबोटी पहाटे साडेपाच वाजल्यापासून रायबंदर धक्क्यावर बांधण्यात आल्या होत्या.

हा मार्ग पणजीला जवळ असल्याने नेहमीच गर्दी होते. त्यामुळे चोडण, डिचोली व सत्तरी तालुक्यातील प्रवाशी या धक्क्यावर अडकून पडले. दुचाकी व चारचाकी वाहनांची प्रचंड गर्दी चोडण फेरी धक्क्यावर दिसत होती.

कर्मचारी आधुनिक तंत्र वापरत नाहीत?

धुक्यामुळे वारंवार व्यत्यय येत असल्याने या धुक्यावर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान खाते का वापरत नाही, असा प्रश्न अनेक प्रवाशांनी खात्याचे अधिकारी विक्रम भोसले यांच्याकडे केला आहे मोबाईलच्या ‘जीपीएस’ तंत्र खात्याचे कर्मचारी व कॅप्टन का वापरत नाहीत, असाही सवाल केला जात आहे.

सकाळी धुके पडल्याने दोन फेरीबोटी चोडण बाजूकडे असल्याने लोकांनी या जीपीएस चा वापर करून दोन्ही फेरीबोट चालवण्यास कर्मचाऱ्यांनी व कॅप्टनला मदत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT