Illegal Boating: बेकायदा व्यवसाय करणाऱ्या बोटीला मिळाली जलसमाधी?

पर्यटकांना समुद्रसफर घडविण्याच्या व्यवसायासाठी आणलेल्या स्वॉफिश बोटीला रविवारी सायंकाळी अरबी समुद्रात जलसमाधी मिळाली.
Boat|Illegal Boating
Boat|Illegal BoatingDainik Gomantak
Published on
Updated on

Illegal Boating: पर्यटकांना समुद्रसफर घडविण्याच्या व्यवसायासाठी आणलेल्या स्वॉफिश बोटीला रविवारी सायंकाळी अरबी समुद्रात जलसमाधी मिळाली. या बोटीवरील सहा कर्मचाऱ्यांची किनाऱ्यावरील इतर खासगी बोटमालकांनी सुटका केली आहे. सध्या बोट बुडाल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुडालेली बोट केरळमध्ये नोंदीत असून, ही बोट एप्रिल 2023 पर्यंत गोव्यात तिचे नांगर टाकून उभी राहणार होती.

कॅप्टन ऑफ पोर्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बोट वास्कोवरून येत असताना बुडाली. बोटीच्या तळाला छिद्र पडल्याने तिच्यामध्ये पाणी शिरले आणि ती हळूहळू जलसमाधी घेऊ लागली.

बोटीमध्ये पाणी येत असल्याचे समजल्यानंतर बोटीवरील कर्मचाऱ्यांनी काही खासगी बोटमालकांना पाचारण केले आणि तिच्यातून सुटका केली. या बोटीचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाला आहे.

पर्यटकांना खास जलप्रवास घडविणारी ही बोट असून, केरळमधील व्यक्तीच्या नावे ती नोंद आहे. या बोटीतून साधारण 40 प्रवासी प्रवास करू शकतात. केरळमधील एर्नाकुलमच्या किशोर मेनन यांच्या मालकीची ही बोट आहे.

2009 मध्ये या बोटीची बांधणी झाली होती. दरम्यान, ही बोट एका आयलँडवरून परतत असताना राजभवनपासून काही अंतरावर समुद्रात बुडाली. या बोटीमध्ये काही प्रवासी होते अशी चर्चा सुरू आहे.

Boat|Illegal Boating
Goa Government: पुढील दोन वर्षांत गोवा सरकारला फेडावे लागणार तब्बल 10,277 कोटी रुपये

हा प्रश्‍न राहतो उपस्थित?

गोव्यात ती बोट आल्यानंतर तिची तपासणी कोणी केली आणि त्यांना त्या बोटीच्या दर्जाची कल्पना आली नाही काय? मरिन इंजिनियर हे बोटींचे मशिन तपासणी करतात. तर बोटीच्या हल्सची तपासणी ही मास्टर मरिन करीत असतात. त्यामुळे मशिन इंजिनियर हेच तपास करून अहवाल देणार असतील, तर अनेक प्रश्‍न उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com