Covid Vaccination: राज्य सरकार बुधवार, 18 रोजीपासून आरोग्य सेवा संचालनालयाच्या अंतर्गत निवडक सरकारी रुग्णालयांमध्ये 18 वर्षांवरील व्यक्तींना मोफत कोविशिल्ड लसीकरण मोहीम पुन्हा सुरू करणार आहे. ही लस फक्त निवडक सामुदायिक, प्राथमिक व शहरी आरोग्य केंद्रांसह गोमेकॉत उपलब्ध असेल.
राज्यात अजून काहीजणांनी ही लस घेतलेली नाही व महामारीही संपलेली नसल्याने सावधगिरी बाळगण्यासाठी ती मोफत उपलब्ध केली आहे, अशी माहिती लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. उत्तम देसाई यांनी दिली.
केंद्राकडून गोव्यासाठी सुमारे 1 हजार डोस आज पाठवल्याने लसीकरणास उद्यापासूनच सुरुवात करण्याचे ठरवले आहे. हे डोस संपल्यानंतर आणखी मागणी केली जाईल. कोविड लसीच्या एका बाटलीत 10 डोस असतात.
त्यामुळे दरदिवशी हे लसीकरण ठेवल्यास किमान पाचपेक्षा अधिकजण लसीकरणास आल्याशिवाय ही बाटली वापरल्यास त्यातील उर्वरित डोस वाया जाऊ शकतात.
त्यामुळे दोन दिवस निश्चित केल्याने लाभधारक त्यादिवशीच येतील, असे मत डॉ. देसाई यांनी व्यक्त केले. ही मोहीम आठवड्यातून दोन दिवस दर बुधवारी सकाळी 9 ते 4 या वेळेत, दर शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत सुरू राहील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.