Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: जयेश चोडणकर मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद, आयआरबी पोलिसाचाही समावेश

‘आरबीआय’चा पोलिस कर्मचारी निलंबित

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime गेल्या आठवड्यात चिंबल जंक्शनवर वाहन पार्किंगवरून झालेल्या भांडणानंतर टॅक्सीचालक जयेश चोडणकर याच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी संशयित कृपेश वळवईकर (बिठ्ठोण) तसेच आयआरबीचा पोलिस प्रीतेश हडकोणकर या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

संशयित हडकोणकर हा 48 तासांहून अधिक काळ पोलिस कोठडीत राहिल्याने त्याला सेवेतून निलंबित केले आहे. या प्रकरणात आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे. हा पूर्वनियोजित खून होता का, याचीही चौकशी पोलिस करत आहेत.

बुधवारी चोडणकर यांचे कुटुंबीय त्यांचा मृतदेह ताब्यात घेणार असल्याचे सांगण्यात आले. जयेश यांचा मृत्यू अपघातामुळे नव्हे, तर मारहाणीमुळे झाला असून तो घातपातच असल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता.

जुने गोवे पोलिसांनी या प्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. संशयितांनी जयेशला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला होता, तर जयेशला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याचा दुसरा गुन्हा दाखल केला होता.

जयेश यांना धडक दिल्याचा संशय असलेल्या वाहनाच्या चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यात काहीच तथ्य आढळले नाही. जयेश यांच्या शवचिकित्सा अहवालात त्यांच्यावर दंडुक्याने झालेल्या प्रहारामुळे रक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. तसेच वाहन गेल्याने त्यांचे पाय चिरडल्याबाबत अहवालात कोठेच उल्लेख केला नव्हता.

चोडणकर कुटुंबीयांनी जयेश यांचा संशयितांनी पूर्वनियोजित कट आखून खून केल्याचा दावा करून खुनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. जोपर्यंत खुनाचा गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा स्पष्ट इशारा चोडणकर कुटुंबीयांनी दिला होता. त्यामुळे पोलिसही पेचात सापडले होते.

पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी सोमवारी जुने गोवे पोलिस स्थानकात जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली होती.

पाय चिरडलेच नाहीत

प्रथमदर्शनी जयेश यांना जबर मारहाण केल्याचे शवचिकित्सा अहवालात नमूद केले आहे. ते रस्त्यावर पडले असता, वाहन त्यांच्या पायावरून गेल्याने पाय चिरडले, असे प्रथमदर्शनी तपासात आढळलेले नाही.

ही घटना संशयास्पद असून पोलिसांनी केलेल्या तपासात संशयितांसह जयेशचे वैमनस्य असल्याने हा खून झाल्याची शक्यता गृहीत धरून खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.

धमकीही दिली होती

संशयितांनी जयेश यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. जयेश यांना संशयितांसह आणखी काहीजणांचा गट मारहाण करताना तेथील काही स्थानिक लोकांनी पाहिले होते.

मारहाणीतून सुटका करून घेऊन जयेश धावत असताना त्यांचा पाठलाग करून पुन्हा त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्यात कोणत्या कारणासाठी वाद होता, याचा तपास पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT