one drown at Cansaulim
one drown at CansaulimDainik Gomantak

Cansaulim News: आंघोळीसाठी चिरेखाणीत उतरला अन् पाण्यात बुडाला, 'मैनापी' नंतरची दुसरी धक्कादायक घटना

कासावलीत दुर्घटना : पोहता येत नसतानाही विद्यार्थी गेला डोहात
Published on

Cansaulim News मैनापी धबधब्यावर बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना ताजी असतानाच आज, मंगळवारी कासावली येथील चिरेखाणीत आंघोळीसाठी गेलेल्या एकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या १२ दिवसांत वेगवेगळ्या घटनांत 8 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

साकवाळ-झुवारीनगर एमईएस कॉलेजमध्ये अकरावीच्या वाणिज्य वर्गातील तीन विद्यार्थी सकाळी १०.३० वाजता आंघोळ करण्यासाठी कुवेली-कासावली येथील अनेक वर्षे बंद असलेल्या परंतु पाण्याने भरलेल्या चिरेखाणीत गेले असता, शांतीनगर-वास्को येथील १६ वर्षीय विद्यार्थी अनिल शंकर चव्हाण याने सर्वप्रथम पाण्यात उडी मारली.

परंतु पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. यावेळी त्याचे इतर दोन मित्र तेथेच होते. अनिल याला पोहता येत नव्हते, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.

घटनास्थळी दाखल झालेल्या लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. वेर्णा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक महेश नाईक यांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिसियो इस्पितळात पाठवला.

अनिलला वाचवण्याचे प्रयत्न निष्फळ

अनिल चव्हाण याने पाण्यात उडी मारली; परंतु तो पाण्यातून बाहेर येत नसल्याने त्याच्यासोबतच्या दोन्ही विद्यार्थ्यांनी आरडाओरडा करायला सुरवात केली.

यावेळी तेथे जवळच असलेल्या आनंद लमाणी या युवकाने त्वरित चिरेखाणीत उडी मारून बुडालेल्या अनिलला पाण्यातून बाहेर काढले. त्याच्यावर प्रथमोपचार करण्याचा प्रयत्न केला; पण अनिल चव्हाण याचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता.

one drown at Cansaulim
Goa Petrol-Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या दरात घट? गोव्यातील आजचे दर जाणून घ्या

न्यायालयाच्या सूचनेकडे दुर्लक्ष

काही वर्षांपूर्वी काही विद्यार्थी पेडणे येथे सहलीला गेले होते. तेथे एका पाणी भरलेल्या चिरेखाणीत उतरले असता, त्यातील दोघांचा बुडून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची न्यायालयाने गंभीर दखल घेतली होती.

खाण खात्याने अशा चिरेखाणी एक तर बुजवाव्यात किंवा त्याभोवती संरक्षक उपाययोजना उभारण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या आहेत. मात्र, त्याकडे सरकारी यंत्रणेकडून दुर्लक्ष झाल्यानेच कासावली येथे या घटनेची पुनरावृत्ती घडली.

one drown at Cansaulim
Goa Rajyasabha Election 2023: सदानंद शेट तानावडे राज्यसभेवर बिनविरोध

कुर्डीतील खंदकाच्या पाण्यात तरुणाचा मृतदेह

कुर्पे, वाडे-कुर्डी येथील सर्वेश तुळशीदास वाडेकर (वय 21 वर्षे) याने खाणीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याचा कयास व्यक्त केला जात आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी सात वाजता घडल्याचे सांगण्यात आले. सर्वेश हा आज, मंगळवारी सकाळी डॉक्टरांकडे जाऊन आला होता.

संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला होता. घरापासून जवळच असलेल्या खाणीच्या काठावर सर्वेशचे चप्पल आणि मोबाईल आढळून आल्याने त्याने खाणीतील पाण्यात उडी मारली असावी, असा कयास व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी शोध सुरू केला असता, रात्री 10 वाजता त्याचा मृतदेह सापडला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com