Goa Taxpayer Dainik Gomantak
गोवा

Goa Taxpayer: गोव्यातील करदात्यांच्या सतावणुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; तांत्रिक अडचणी दूर करण्याचे चेंबर ऑफ कॉमर्सकडून आवाहन

Goa Chamber of Commerce and Industry: गोव्यातील अनेक करदात्यांना वित्तीय वर्ष 2023-24 साठी प्राप्तीकर परतावा सादर केल्यानंतर प्राप्तीकर विभागाकडून ‘डिफेक्टिव्ह रिटर्न’ संबंधित नोटीस मिळाली आहे.

Manish Jadhav

पणजी: गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने केंद्रीय वित्त मंत्री, बंगळुरचे प्रमुख प्राप्तीकर आयुक्त आणि गोवा प्राप्तीकर आयुक्तांना पत्र लिहून गोव्यातील करदात्यांना होत असलेल्या सतावणुकीचा विषय उपस्थित केला आहे. चेंबरचे अध्यक्ष उद्योगपती श्रीनिवास धेंपे आणि कर समितीचे अध्यक्ष सनदी लेखापाल रोहन भंडारे यांनी हे पत्र लिहिले आहे.

डिफेक्टिव्ह रिटर्न नोटीस

गोव्यातील अनेक करदात्यांना वित्तीय वर्ष 2023-24 साठी प्राप्तीकर परतावा सादर केल्यानंतर प्राप्तीकर विभागाकडून ‘डिफेक्टिव्ह रिटर्न’ संबंधित नोटीस मिळाली आहे. यामध्ये करदात्यांचे किंवा त्यांच्या जोडीदारांचे लेखापरीक्षण आवश्यक असल्याचे कारण देण्यात आले आहे. मात्र, हे वास्तव नसताना चुकीची नोटीस पाठवली गेली आहे. ही समस्या ‘पोर्तुगीज सिव्हिल कोड’अंतर्गत येणाऱ्या करदात्यांच्या रिटर्न्सची तांत्रिक चूक म्हणून ओळखली गेली आहे.

कारण आयकर परताव्यातील परिशिष्ट 5 अ या विभागात दोन प्रश्न विचारले जातात; परंतु या प्रश्नांना एकत्रित उत्तर देण्यासाठी एकच पर्याय दिल्याने हा तांत्रिक गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक करदात्यांना अनावश्यकपणे उत्तर द्यावे लागत आहे आणि त्यांची ऊर्जा व वेळ वाया जात आहे, याकडे पत्रातून लक्ष वेधण्यात आले आहे.

तांत्रिक अडचणी दूर कराव्यात!

अशा चुका न होण्यासाठी चेंबरने प्राप्तीकर विभागाला तांत्रिक अडचणी दूर करुन त्वरित योग्य निर्णय घेण्याची विनंती केली आहे. त्याचप्रमाणे, सणासुदीच्या काळात अशा सूचना न पाठवण्याचे आवाहनही केले आहे. या समस्येबद्दल तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT