तरंगाच्या लग्नविधी आणि गाठी -भेटी Dainik Gomantak
गोवा

Goa: पर्येतील पारंपरिक दसरोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

तिन्ही तरंगे माजीकवाडा येथे सीमोल्लंघन करून पुन्हा रवळनाथ मंदिरात (Temple) आली. त्यानंतर मंदिरात भाविकांना कौल दिला.

दैनिक गोमन्तक

पर्ये: पर्ये सत्तरी येथील वैशिष्ट्य पूर्ण दसरोत्सव (Dussehra) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील श्री रवळनाथ मंदिराच्या (Ravalnath Temple) प्रांगणात देव रवळनाथ, देव भूतनाथ व देवी पावणाई यांची तरंगे व देव रवळनाथ यांचा कळस यांची विधिवत पूजा अर्चा व गाऱ्हाणे घातल्यावर तिन्ही तरंगे व कळसाचे प्रस्थान कलम वृक्षाकडे गेली.

तिथे पूजा अर्चा झाल्यावर भाविकांनी (Devotees) कलमाची पाने सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर महादेव मंदिरासमोरील खुल्या जागेत शिवलिंग विधी झाला. यावेळी तिन्ही तरंगाच्या भेटी गाठी झाल्या. त्यानंतर तरंगे महादेव मंदिराला पाच फेरे मारण्याचा विधी व पूजा अर्चा झाली.

त्यानंतर तिन्ही तरंगे माजीकवाडा (Tarange Majikwada) येथे सीमोल्लंघन करून पुन्हा रवळनाथ मंदिरात आली. त्यानंतर मंदिरात भाविकांना कौल दिला.

या तरंगोत्सवाला भाविकांनी मोठी उपस्थिती लावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT