काणकोण: लोलये येथील श्री संकर्षण देवाचा दसरोत्सव थाटात साजरा करण्यात आला. काजळकेर- लोलये येथे हे देवालय असून या देवालयाचा ऐतिहासिक बांध संस्कृतीशी संबंधित आहे.दसरोत्सवात (Dussehra) श्री निराकार देवाची छत्री व श्री संकर्षण देवाचे तरंग,जाण, भगत असा लवाजमा असतो.
श्री संकर्षण देवालयात मुख्य दसऱ्याचा अवतार झाल्यानंतर लवाजमा भाविकांनी उभारलेल्या तोरणांत आदर आतिथ्य स्विकारून सुमारे सहा वाजता माशे येथील श्री निराकार देवालयाच्या प्रांगणात प्रवेश करतो.
त्याठिकाणी भक्तगणांना कौल प्रसाद दिल्यानंतर लवाजमा भगवती पठारावर आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्यासाठी जातो.या ठिकाणी आपट्याच्या वृक्षाची (Tree) विधीवत पुजा केली जाते. त्यानंतर वाजत गाजत लवाजमा लोलयेचे ग्राम दैवत श्री केशव देवालयात रात्री नऊच्या दरम्यान पोचतो या ठिकाणी भाविकांना कौल प्रसाद दिल्यानंतर लवजमा आपल्या मूळ स्थानी श्री संकर्षण देवालयात (Temple) पोचल्यानंतर सर्व धार्मिक विधी करून दसरोत्सवाची सांगता केली जाते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.