Crime News Dainik Gomantak
गोवा

Crime News: गोपाळ नाईक हाच सूत्रधार की पडद्यामागे आणखी कोणी? श्रीनिवास नायक गोळीबारप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू

Srinivas Naik Firing Case: पर्वरी येथे कॅसिनो व्यावसायिक श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी कुंडई येथील गोपाळ नाईक याला अटक केल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: पर्वरी येथे कॅसिनो व्यावसायिक श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी कुंडई येथील गोपाळ नाईक याला अटक केल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. गुन्हे शाखेने शनिवारी सायंकाळी श्रीनिवास नायक यांच्याकडून या प्रकरणासंदर्भात माहिती घेतली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक वादातून हा गोळीबार झाला की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. सुरुवातीला पर्वरी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. मात्र, तपासाला अपेक्षित गती न मिळाल्याने हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले.

गुन्हे शाखेने गोळीबार करणारे आरोपी, त्यांचा चालक आणि आता गोपाळ नाईक याला अटक केली. गोपाळ नाईक हाच या प्रकरणातील सूत्रधार आहे की त्याच्यामागे आणखी कोणी आहे, याचाही शोध घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सूत्रधाराचा शोध महत्त्वाचा

गोळीबार करणारे आरोपी, त्यांचा चालक आणि संशयित गोपाळ नाईक यांना अटक केल्यानंतर गुन्हे शाखेने तपासाची पुढील दिशा निश्चित केली आहे. मात्र, प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्यांपासून मुख्य संशयितापर्यंतची साखळी उलगडल्यानंतरही हल्ल्यामागील नेमके कारण आणि त्यामागे अन्य कोणाची भूमिका आहे का, हे स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. गोपाळ नाईक याने दिलेली माहिती व श्रीनिवास नायक यांच्याकडून मिळालेले तपशील यांची पडताळणी झाल्यानंतर यातील सत्य बाहेर येऊ शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "तो आमचा हिरो''! स्मित मच्छार यांच्यासाठी इस्त्रायली गायकानं गायली हनुमान चालीसा; यूजर्स म्हणाले, 'अंगावर शहारे आले...'

Indian Super League: घरच्या मैदानावर विजयाचे लक्ष्य! गौरमांगी सिंग यांच्या नेतृत्वाखाली एफसी गोवा चेन्नईयीनविरुद्ध भिडणार

Ranji Trophy Cricket: गोव्याच्या रणजी संघाची धुरा अभिनव तेजराणाकडे; शिवेंद्र भुजबळला पदार्पणाची संधी, ऋत्विकचे पुनरागमन

Ajit Fast Patrol Vessel: गोवा शिपयार्डची मोठी कामगिरी! भारतीय तटरक्षक दलाच्या 'अजित' गस्ती जहाजाचे राष्ट्रार्पण

Rohit Sharma Fan: रोहित शर्मा वर्ल्ड कप जिंकणार तेव्हाच दाढी करणार अन् केस कापणार! हिटमॅनच्या चाहत्याचा हटके संकल्प चर्चेत

SCROLL FOR NEXT