Panjim: केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी (Union Tourism Minister) यांनी गोव्याला देशाची 'कॅसिनो (Goa Casino) राजधानी' म्हणून केलेली खोचक टिप्पणी सध्या चांगलीच चर्चेत आहे. याला प्रत्युत्तर देत नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) गोवा युनिटने म्हटले आहे की भाजपच्याच नेतृत्वाखालील सरकार चालत आहे. "असंवेदनशील भाजप सरकार गोव्याला कॅसिनोची राजधानी बनवू इच्छित आहे, कारण पक्ष आणि त्यांचे सरकार कॅसिनो लॉबीद्वारे निधी पुरवते, असा आरोप एनएसयूआय (NSUI) गोव्याचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी भाजपवर केला.
“केंद्रीय मंत्र्यांचे भाष्य हे स्पष्ट संकेत देत आहे की पक्ष आणि सरकार कॅसिनो लॉबीद्वारे चालवले जाते,”यावरून भाजप पुन्हा एकदा गोवाविरोधी असल्याचे सिद्ध झाले आहे.
शनिवारी गोवा दौऱ्यादरम्यान रेड्डी म्हणाले होते की, "लोकांनी आधीच गोव्याला कॅसिनो कॅपिटल शीर्षक दिले असून केंद्र गोव्याला भारताची कॅसिनो राजधानी म्हणून घोषित करण्यास तयार आहे." या विधानावर राज्यभरातून जोरदार टीका झाली. दरम्यान सध्या राज्यात सहा ऑफ शोर कॅसिनो आणि जवळपास डझनभर ऑन-शोअर कॅसिनो कार्यरत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.