Goa Casino Dainik Gomantak
गोवा

Goa Casino: कोविड काळात कॅसिनोत जाणे आले आंगलट

मडगावात कारवाई : कॅसिनोतून 84 लाखांचा ऐवज जप्त; 12 जण अटकेत

दैनिक गोमन्तक

पणजी: मडगाव (Margao) येथील एका इमारतीच्या बंद खोलीत सुरू असलेल्या बेकायदा कॅसिनोवर (Goa Casino) गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) पथकाने छापा टाकून 12 जणांना अटक केली. तसेच कॅसिनो (Casino) जुगारासाठीच्या चिप्स, कॅसिनो यंत्रे, रोख रक्कम व मोबाईल्स मिळून सुमारे 84 लाखांचा माल जप्त केला. हा कॅसिनो संशयित रेहान मुजावर चालवत होता.

नावेली येथील रेहान हा गेल्या अनेक महिन्यांपासून बेकायदा कॅसिनो चालवत होता. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील कॅसिनो बंद असताना तो खुलेआम कॅसिनो चालवत असल्याने हा गुन्हा ठरला आहे. या कॅसिनोविरोधात स्थानिकांकडून तक्रारीही दाखल झाल्या होत्या. त्यामुळे क्राईम ब्रँचच्या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला. कॅसिनोचा चालक रेहन मुजावर याने दहा तरुणांना तेथे कामाला ठेवले होते. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांची नावे किस्मत कामत, रिषभ नाईक, सेल्विन कुलासो, आकाश खुटकर, इव्हान रॉड्रिगीस, शैलेश वेळीप, श्रीपाद उत्तम नाईक, रुपेश बांदेकर अशी आहेत.

हे सर्वजण कॅसिनो जुगाराची यंत्रे चालविण्याचे काम करत होते. तसेच या ठिकाणी जुगार खेळण्यास आलेले निझामुद्दिन मसूर, अरिफ हन्सीमरड, सरवर सय्यद, रिझवान सय्यद, दुपेंद्र पून, अस्लम खान, मुस्तफा शेख, जोझ परेरा, सर्फराज खान, सय्यद शेख, झहिर खानापुरी यांचा समावेश आहे. या ठिकाणी अंदर बाहर, ब्लॅक जॅक तसेच फिरत्या कॅसिनो मशीनवर जुगार सुरू होता. या सर्वांना पोलिसांनी जुगार प्रतिबंधक कायद्याखाली अटक केली आहे. हा गुन्हा जामीनपात्र असल्याने त्यांची सुटका करण्यात आली. पोलिस निरीक्षक सतीश गावडे, निरीक्षक लक्षी आमोणकर, उपनिरीक्षक गिरिश पाडलोस्कर, हवादार संतोष गोवेकर, कॉन्स्टेबल गौरिश नाईक व संकल्प नाईक या पथकाने ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT