Plan Goa Trip: काय आहे गोव्यातील कॅसिनोची खासियत?

मागील काही वर्षात भारतामध्ये गोवा कॅसिनोसाठी ठरतोय आकर्षणाचा केंद्र
Casino
CasinoDainik Gomantak
Published on
Updated on

पर्यटनासाठी नेहमीच आकर्षण ठरणऱ्या गोव्यात पर्यटकांची वर्दळ नेहमीच चालु असते. पर्यटकांशिवाय गोव्याला शोभा नाही हे तितकेच खरे. काही पर्यटकांना गोव्याची पूर्ण माहिती आहे; पण काही किंवा नवीन पर्यटकांसाठी गोवा केवळ बीच पुरताच मर्यादित आहे. तसे बघायला गेलं तर गोवा पर्यटनाच्या तर दृष्टीने व्यापक आहेच, परंतु गेल्या काही वर्षात भारतात गोवा कॅसिनोसाठी सुद्धा आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरत आहे.

Casino
कोरोना काळात लग्नाचा विचार करतायं ही 6 ठिकाणे आहेत उत्तम Wedding Destinations

कॅसिनो म्हणजे नक्की काय:

काही पर्यटक केवळ कॅसिनो खेळण्यासाठी गोव्यात येतात तर काहींना कॅसिनो म्हणजे नक्की काय हेच माहित नाही. तसे बघायला गेलं तर कॅसिनो हा एक प्रकारचा जुगारच आहे. मोठ्या रकमा या जुगारात लावुन हा खेळ खेळला जातो. कॅसिनो हा इलेक्ट्रिक असुन गणिती आकडेमोडीवर खेळला जातो. गोव्यामध्ये कॅसिनोची सुरवात 2007 मध्ये कॉंग्रेस सरकारच्या कारकिर्दित झाली. एकंदरीत गोव्याचे पर्यटन पहाता कॅसिनोला गोव्यात पोषक वातावरण आहे. गोव्यामध्ये पणजी शहरातील मांडवी नदीमध्ये एकुण सहा कॅसिनो आहेत.या ठिकाणी कॅसिनो मध्ये जाण्यासाठी एक ठराविक रक्कम आकारली जाते. कारण आत मध्ये या लोकांनी मनोरंजनाच्या अनेक सोयी सुविधा केलेल्या असतात.

Casino
टॉलिवूडची टीम गोव्यात: पर्यटनावर बंदी; शूटिंग मात्र जोरात!

कॅसिनोमुळे गोव्याला होतोय फायदा:

मध्यंतरी गोव्यामध्ये कॅसिनोवर बंदी घालण्याच्या चर्चा चालु होत्या; कारण या ठीकाणी वेश्या व्यवसाय, आणि अंमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत होती. पण ती चर्चा तीथच विरली. कालांतराने कॅसिनो मधुन गोवा सरकारला खुप मोठा फायदा होण्यास सुरवात झाली. 2005-06 या दरम्यान गोव्याचा करमणुक कर हा केवळ 5.18कोटी इतका होता. परंतु आजच्या घडीला तो 160 कोटींच्या वर गेलाय व परवाना नुतनीकरण कर हा 200 कोटी इतका मिळतोय. शिवाय कॅसिनो मुळे अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. म्हणुनच कॅसिनो गोव्यात अर्थिक राज्य करत असुन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या करमणुक क्षेत्रात कॅसिनोला स्थान मिळाले आहे.

कॅसिनो मधील प्रमुख गेम:

कॅसिनो ग्राहक स्लॉट मशीन, रूलेट, ब्लॅकजॅक, पोकर आणि संधीचे इतर खेळ खेळू शकतात. खरंतर कॅसिनो ही पाश्चात्य देशातून आलेला खेळाचा प्रकार असुन कॅसिनोमुळे आर्थिकदृष्ट्या विकसित झालेले काही शहर अटलांटिक सिटी, सांता फे, रेनो, न्यू ऑर्लिअन्स आणि लास वेगास, अमेरिकेत आहेत. युरोपमध्ये, साल्झबर्ग, ऑस्ट्रिया; नेदरलँड सनरेमो, इटली; मोनॅको; आणि एस्टोरिल, पोर्तुगालमध्ये, दक्षिण अमेरिका मध्ये, पंटा डेल एस्ट, उरुग्वे; आणि आशिया, गोवा आणि मकाऊ, पूर्व चे मुख्य गेम सेंटर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com