Divya Rane, Cashew Festival Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Cashew Fest: काजू हा आमचा वारसा! महोत्सवातून देणार इतिहासाला उजाळा; दिव्या राणेंचे प्रतिपादन

Divya Rane: व्यावसायिकांना चालना देणे आणि गोव्याला काजू उत्पादनात स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने काजू महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे राणे यांनी सांगितले.

Sameer Panditrao

पणजी: वन विकास महामंडळातर्फे भरवण्यात येणारा काजू महोत्सव २५ ते २७ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला असून २५ रोजी सायंकाळी ४.३० वा. कांपाल येथील डी. बी. बांदोडकर मैदानावर या महोत्सवाचे उद्‍घाटन होणार आहे, अशी माहिती वन विकास महामंडळाच्या अध्यक्षा आमदार दिव्या राणे यांनी दिली.

गोव्यात काजूचे उत्पादन १६ व्या शतकापासून घेण्यात येते. काजू हा आमचा वारसा आहे, परंतु सद्यःस्थितीत काजूचे उत्पादन राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत घट होत आहे. त्यामुळे गोव्यातील काजू उत्पादन वाढविणे, शेतकरी, काजूचे व्यावसायिकांना चालना देणे आणि गोव्याला काजू उत्पादनात स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने काजू महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे राणे यांनी सांगितले.

वन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यवस्थापक नंदकुमार परब व महाव्यवस्थापक अमर हेबळेकर उपस्थित होते.

२५ रोजी उद्‍घाटन सोहळ्यानंतर विविध कार्यक्रम, सकाळी तांत्रिक सत्रे ज्यामध्ये काजू शेती लागवड, व्यवस्थापन यासंबंधी कृषी अधिकारी मार्गदर्शन करतील.

महत्त्वाची घोषणा करणार

काजू महोत्सवादरम्यान हरित उपक्रम आणि काजू उत्पादकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या उपक्रमाच्या अनुषंगाने दोन महत्त्वाच्या घोषणा करण्यात येणार आहेत. हा महोत्सव खऱ्या अर्थाने काजू उत्पादन, उत्पादक, व्यावसायिक आणि गोमंतकीय काजूच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही प्रयत्नरत असल्याचे दिव्या राणे यांनी सांगितले.

फेणी गाळपाचे प्रात्यक्षिक

महोत्सवाच्या ठिकाणी काजू बोंडूपासून फेणी करण्यापर्यंतच्या प्रक्रियेचा अनुभव नागरिकांना घेता येईल. काजूचे गर कसे वेगळे केले जातात, बोंडू कसे मळतात, त्याच्यापासून फेणी कशी बनविली जाते याचे प्रात्यक्षिक या महोत्सवादरम्यान पाहायला मिळेल. त्यासोबतच काजूचा इतिहास, त्याच्याशी संबंधित कथा या चित्रस्वरूपात, कॅरिकेचरच्या माध्यमातून नागरिकांना पाहायला मिळतील. तसेच पन्नासहून अधिक फूड व इतर स्टॉल्स हे काजू उत्पादनाशीच संबंधित असणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT