Goa Cashew Farmers
Goa Cashew Farmers Dainik Gomantak
गोवा

Cashew Farmer : आमचा अंत पाहू नका; हमीभाव वाढवा

गोमन्तक डिजिटल टीम

विश्‍‍वनाथ नेने

Cashew Farmer :

पणजी, राज्‍यातील काजूउत्‍पादक हताश झाले आहेत. यंदा उत्‍पादन कमालीचे घटले असून सरकारने हमीभाव प्रतिकिलो २०० रुपये करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गेल्‍या वर्षीही काजू बागायतदार असेच होरपळले होते.

मुख्‍यमंत्र्यांनी गेल्‍या वर्षी काजूमहोत्‍सवात काजूला हमीभाव १५० रुपये केल्‍याची घोषणा केली, परंतु त्‍याची अधिसूचना काढायला बराच विलंब लागला. दरम्‍यान, आजपासून राजधानी पणजीत सरकारच्या वनविकास महामंडळातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या दुसऱ्या काजूमहोत्सवाला सुरूवात होत आहे. त्‍याकडे आता काजूउत्‍पादकांचे लक्ष लागून राहिले आहे.

निवडणुकीच्‍या धामधुमीत सरकारला काजूउत्‍पादकांच्‍या कथा आणि व्‍यथांचा विसर पडला आहे. सरकार खरेच सामान्‍यांचे असेल तर ठोस पावले उचलली पाहिजेत. तीन दिवस चालणाऱ्या या काजू महोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. त्याचबरोबर काजूसंबंधीचे वेगवेगळे पदार्थ, पेय यांची दालनेही असणार आहेत. गेल्या वर्षी सुरू झालेला हा काजूमहोत्सव यशस्वी ठरला होता.

शहरी लोकांसाठी तो आकर्षण ठरत असला तरी गोव्यातील ग्रामीण भागातील काजूउत्पादक शेतकरी या महोत्सवाच्या निमित्ताने सरकारकडून आणि खास करून मुख्यमंत्र्यांकडून काही घोषणा होते का, याकडे डोळे लावून बसले आहेत. काजूला किमान हमीभाव १८० रुपये मिळावा अशी त्‍यांची अपेक्षा आहे.

आफ्रिकन काजूचे गोव्यावर संकट :

गेल्या काही वर्षांपासून आफ्रिका खंडातून गोव्यात मोठ्या प्रमाणात समुद्रमार्गे काजूची आवक करण्यात येत आहे. अफ्रिकेतील काजू हा गोव्यातील काजूच्या मानाने चव व किमतीच्‍या बाबतीत खूपच कमी दर्जाचा आहे. मात्र हा काजू गोव्यात आणून त्यावर प्रक्रिया केली जाते व तो गोव्‍याचाच म्‍हणून त्‍याची विक्री केली जाते. या प्रकारामुळे गोव्यातील काजूउत्पादकांवर मोठे संकट ओढवले आहे.

प्रतिकिलो १५० रुपये दर कमीच

गेल्या वर्षी सरकारकडून काजूला दीडशे रुपये हमीभाव देण्यात आला होता. परंतु तो अपुरा आहे. यंदा काजू पीक अर्ध्याने घटले असल्‍यामुळे बेणकटीसाठी येणारा खर्चही भरून येणे दुरापास्त आहे.

शिवाय बाजारात काजू पिकाचा भाव प्रतिकिलो ११० रुपये एवढा कमी झाल्याने किमान हमीभाव हा १८० रुपये एवढा हवा, अशी मागणी काजूउत्‍पादकांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अज्ञात युवकांकडून म्हावळींगे गावात 'भू-सर्व्हेक्षण'; संतप्त गावकऱ्यांनी सर्व्हेचे काम रोखले, संशयित ताब्यात

Goa Todays Live Update: राहुल गांधींविरोधात फोंड्यात पोलिस तक्रार!

Bloomberg Billionaires Index: एलन मस्क यांनी पुन्हा दाखवला जलवा, संपत्तीत मोठी वाढ; अदानी-अंबानींच्या संपत्तीत घट

Goa Filmcity: गोवा फिल्मसिटीच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरु, वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

Goa Dam Water Level: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

SCROLL FOR NEXT