Tanvi Vasta Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud Case: तन्‍वीविरुद्ध 17 नव्या तक्रारी! 1.30 कोटींना गंडा; 83 वर्षीय ज्येष्ठ नागरिकालाही बनवलं बळीचा बकरा

Tanvi Vast and Anand Jadhav: सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेच्या काकोडा शाखेचा व्‍यवस्‍थापक आनंद जाधव या दाेघांच्‍याही विरोधात आणखी १७ लाेकांनी फसवणुकीची तक्रार कुडचडे पोलिस स्‍थानकात दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: आपल्‍या गोड वाणीने लोकांना भुरळ पाडून त्‍यांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारणारी तन्‍वी वस्‍त आणि या कामात तिला साथ देणारा सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेच्या काकोडा शाखेचा व्‍यवस्‍थापक आनंद जाधव या दाेघांच्‍याही विरोधात आणखी १७ लाेकांनी फसवणुकीची तक्रार कुडचडे पोलिस स्‍थानकात दिली आहे.

व्यवस्थापक जाधव याने खातेदारांच्या खात्यावरून परस्पर रक्कम उचलल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. याप्रकरणी आज कुडचडे पोलिसांनी चौथा एफआयआर (FIR) नाेंद केला असून आतापर्यंत ज्‍या तक्रारी आल्‍या आहेत, त्‍या पाहिल्‍यास या द्वयींनी ५० पेक्षा जास्‍त लाेकांना १.३० कोटींचा गंडा घातल्‍याचे उघडकीस आले आहे.

दक्षिण गोव्‍याच्‍या (South Goa) पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी आज घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकरणात एका महिलेचे २५ लाखांचे सोन्‍याचे दागिने तन्‍वीने बदलले होते. तिने हे दागिने धनवर्षा गोल्‍ड लोन या संस्‍थेकडे गहाण ठेवून २५ लाखांचे कर्ज घेतले होते. त्‍यापैकी १८.४५ लाखांचे दागिने कुडचडे पोलिसांनी या संस्‍थेकडून जप्‍त केले आहेत, अशी माहिती सावंत यांनी दिली. यावेळी केपेचे उपअधीक्षक सागर एकोस्‍कर, कुडचडेचे पोलिस निरीक्षक तुकाराम चव्‍हाण तसेच उपनिरीक्षक अरुण ॲण्ड्र्यू हे उपस्‍थित होते.

आज जो चौथा एफआयआर नोंद केला, त्‍यात तन्‍वीने सुषमा अस्‍थाना (वय ६९ वर्षे) या महिलेचे २०.२९ लाख रुपये, स्‍टीव्‍हन फर्नांडिस (वय ५१ वर्षे) यांचे ८ लाख रुपये, तर पाश्‍‍कॉल वाझ (वय ८३ वर्षे) यांचे १.४० लाख रुपये स्वत:च्या खात्‍यात वळते केले. यावरून तन्‍वीने ज्येष्ठ नागरिकांना वृद्धांनाही सोडले नाही, हे स्‍पष्‍ट होते. तन्‍वी ही सेंट्रल बँकेची अधिकृत कर्मचारी नसतानाही आनंद जाधव हा व्‍यवस्‍थापक लोकांचे पैसे ‘एफडी’त गुंतविण्‍याच्‍या बहाण्‍याने तन्‍वीकडे पाठवायचा.

एफडी करण्‍याच्‍या बहाण्‍याने तन्‍वी त्‍यांची रक्‍कम दुसऱ्या खात्‍यात वळविण्‍यासाठीचे फॉर्म भरून घ्‍यायची आणि त्‍या फॉर्मचा वापर करून हे पैसे आपल्‍या खात्‍यात वळवायची. ज्‍यांना त्‍यांचे पैसे ‘एफडी’त गुंतविले आहेत असे सांगितले गेले, त्‍यांना ‘एफडी’त गुंतवणूक केल्‍याची पावती दिली जात नव्‍हती.

व्‍यवस्‍थापकाला विचारले तर तन्‍वी तुम्‍हाला नंतर रिसीट देणार, असे सांगितले जायचे. आतापर्यंत तन्‍वी आणि जाधव या दोघांनी लोकांना १.३० कोटी रुपयांना टोपी घातली असली तरी ही रक्‍कम आणखी वाढू शकते, असे सांगितले जाते.

तन्वी होती एअर होस्‍टेस

लहानपणापासून ग्‍लॅमरस जीवनशैलीची ओढ असलेल्‍या तन्‍वीने अवघ्‍या २० व्‍या वर्षी रॉयल एअरवेज या विमान कंपनीत एअर होस्‍टेसची नोकरी केली होती. तीन वर्षे तिने हे काम केले. त्‍यानंतर ‘मिस एशिया पॅसिफिक’ या सौंदर्य सुंदरी स्‍पर्धेत तिने भाग घेतला.

अशा तऱ्हेच्‍या अनेक स्‍पर्धांमध्ये तिने भाग घेतला हाेता. या स्‍पर्धांत भाग घेण्‍यासाठी ज्‍या महागड्या वस्‍तू खरेदी कराव्‍या लागत होत्‍या, त्‍यासाठी तिला भरपूर पैसा लागायचा. हा पैसा उभा करण्‍यासाठीच ती असल्या उचापती करत होती, अशी माहिती प्राप्‍त झाली आहे.

कुंपणानेच खाल्ले शेत

तन्वी वस्त आणि बँक व्यवस्थापक आनंद जाधव यांच्याविरोधात आज सुषमा दिनेश कुमार (रा. केपे) तसेच आणखी एकाने तक्रार दाखल केल्याने अफरातफरीचा हा आकडा करोडोंच्या घरात जाणार असल्याचे दिसते. सुषमा कुमार यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तन्वी आणि जाधव यांनी आपल्या खात्यातून २० लाख २९ हजार रुपये परस्पर काढल्याचे सांगितले तसेच आणखी एकाने ९ लाख ४० हजार रुपये लाटल्याची तक्रार दाखल केली आहे.

मडगावात जोडप्‍याने घातला १४.५० लाखांना गंडा

सरकारी नोकरी देण्‍याचे आमिष देऊन एका जोडप्‍याने आम्‍हाला साडेचौदा लाखांना गंडा घातल्‍याचे दोन महिलांनी मडगाव स्‍थानकात येऊन सांगितले. यावेळी पोलिसांनी त्‍यांना जेथे घटना घडली आहे, तेथील पोलिस स्‍थानकात जाऊन तक्रार नोंदविण्‍यास सांगितले.

संशयित म्‍हणून त्‍यांनी रोहित पै आणि त्‍याच्‍या पत्नीने आम्‍हाला फसविल्‍याचे सांगितले. आमचे पैसे परत देण्‍यासाठी जो धनादेश दिला होता, तो वठलाच नाही. ‍नंतर रोहितचे आजारपणामुळे निधन झाले. परंतु आता त्‍याची पत्‍नी आमचे पैसे देण्‍यास नकार देत असल्‍याचे या तक्रारदारांचे म्‍हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T-20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची एन्ट्री! 'या' देशाच्या स्वप्नांचा केला चुराडा

Magh Purnima 2026: कष्टाचं फळ मिळणार अन् कष्ट दूर होणार! माघ पौर्णिमेला 5 शुभ योगांचा महासंयोग; 'या' राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात

Video: 'अभिषेक झाला, सूर्या झाला'! भारताचा 'हा' फलंदाज आता चोपणार न्यूझीलंडला; प्रॅक्टिसचा व्हिडीओ झाला Viral

Russia Train Attack: 'काळ्या धुराचे लोट अन् रडणाऱ्या प्रवाशांचा आक्रोश'! रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनची रेल्वे सेवा उद्ध्वस्त; 12 जणांचा मृत्यू Watch Video

Shadashtak Yog 2026: "जुनी कर्जे फिटणार, आनंदाचे दिवस येणार!" मंगळ-गुरुचा महासंयोग 'या' राशींसाठी ठरणार भाग्योदयाची नवी पहाट

SCROLL FOR NEXT